इचलकरंजी नगरपरिषदेचा पाणीपुरवठा सभापती, ताराराणी आघाडीचा नगरसेवक संजय तेलनाडे आणि त्याचा भाऊ , नगरसेवक सुनील तेलनाडे यांच्या ‘एसटी’ गँग या टोळीविरोधात मोका कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मोक्काअंतर्गत कारवाई केलेल्यांमध्ये तेलनाडे भावांशिवाय वकील पवनकुमार उपाध्ये यांच्यासह १८ जणांचा समावेश आहे.

संजय तेलनाडे हा कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख मटका बुकी आहे.  ‘एस.टी.’ गुन्हेगारी टोळीचा तो म्होरक्याही आहे. मटका, हाणामारी, दहशत पसरवणे, खंडणी उकळणे असे गंभीर गुन्हे या टोळीविरोधात दाखल आहेत. या टोळीविरोधातील ‘मोक्का’ कारवाईच्या प्रस्तावाला विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांनी मंजुरी दिली. त्यानंतर कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी तेलनाडे बंधुसह अन्य आरोपींवर मोक्काअंतर्गत कारवाई केली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी सोमवारी याबाबत माहिती दिली. या कारवाईने इचलकरंजी परिसरात खळबळ उडाली आहे.

vinay kore marathi news, dhairaysheel mane marathi news
वारणा समूहाची विश्वासार्हता दाखवून देताना धैर्यशील मानेंना विजयी करा; जनसुराज्यशक्ती पक्षाचे संस्थापक आमदार विनय कोरे
Engineer bribe Dhule district
धुळे जिल्ह्यात ग्रामसेविकेसह अभियंता लाच स्वीकारताना जाळ्यात
in Gadchiroli s sironcha taluka telangana border Rice Smuggling Racket Resurfaces
तेलंगणा सीमेवरील तांदूळ तस्कर पुन्हा सक्रिय! राजकीय नेत्यांचा सहभाग?
thane district, administration, thane water supply department
लोकसत्ता इम्पॅक्ट : ठाणे जिल्हा प्रशासन जागे झाले, पाणी टंचाई आधीच टँकर सुरू करण्याच्या दिल्या सूचना

संजय तेलनाडे याला मटकाचालक सलीम हेपरगी याच्या खूनप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यातून तो निर्दोष बाहेर पडला. त्यानंतर भरत त्यागी खूनप्रकरणी त्याला अटक झाली. सध्या तो जामिनावर बाहेर आहे. इचलकरंजीमध्ये तो मटका किंग राकेश अग्रवाल याच्याशी हातमिळवणी करून मटका-जुगार चालवितो. दरम्यान, मटका अड्ड्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याचे समजताच संजय तेलनाडे साथीदारांसह पसार झाल्याचं समजतंय.