मेहकर तहसील कार्यालयाच्यावतीने अवैध उत्खनन माफियांना १८ लाख ९ हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे. ही कारवाई तहसीलदार निर्भय जैन यांनी केली असून यात दोघांना दंडाचा आदेश पारित करण्यात आला आहे.
यासंदर्भात सविस्तर वृत्त असे की, साखरखेर्डा येथील राजेंद्र काटे यांनी मौजे कल्याणा ते बाभुळखेड रस्त्याच्या कामासाठी विनापरवाना ८० ब्रास मुरूमाचीच वाहतूक केली. मौजे उसरण येथील विमलबाई भीमराव शेळके यांच्या मालकीचा गट नं ३०/१ मधील जागेतून ३२५ ब्रास मुरूमाचे अवैध उत्खनन केले, असा पंचनामा नागझरी बु. येथील तलाठी गारोळे व कल्याणा येथील तलाठी तांबेकर यांनी केला होता. त्यावर राजेंद्र काटे यांना याप्रकरणी तहसील कार्यालयात हजर राहण्याकरिता नोटीस देण्यात आली होती, परंतु ते हजर न राहल्याने तहसीलदार निर्भय जेैन यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८ (७) नियामान्वये ४०५ ब्रास मुरूमाचे अवैध उत्खनन केल्याबद्दल राजेंद्र काटे यांना कलम (४८) नुसार १२ लाख ९७ हजार रुपये दंडाचा आदेश पारीत केला आहे. त्यानंतर मौजे गोहोगाव ते डोणगाव रस्त्याच्या कामासाठी अे.जी.मापारी यांनी विनापरवाना १६० ब्रास मुरूमाचे उत्खनन केल्याचा पंचनामा तलाठी गोहोगाव यांनी १५ एप्रिल २०१४ रोजी केला होता. त्यानंतर अे.जी.मापारी यांना तहसील कार्यालयात हजर राहण्यासंदर्भात अनेक वेळा नोटीस दिल्या, परंतु ते एकदाही हजर राहिले नाही. त्यामुळे तहसीलदार निर्भय जैन यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८ (७) नियमान्वये १६० ब्रास मुरूमाचे अवैध उत्खनन केल्याबद्दल अे.जी.मापारी यांना ५ लाख १२ हजार रुपये दंडाचा आदेश पारीत करण्यात आला आहे. तहसीलदार निर्भय जैन यांनी अवैध मुरूम उत्खननाबद्दल केलेल्या धडक कारवाईमुळे अवैध उत्खनन माफियांचे धाबे दणाणले आहेत.

Central Park in Thane, Thane,
ठाण्यातील सेंट्रल पार्ककडे पर्यटकांचा ओढा, पालिकेच्या तिजोरीत १ कोटी १६ लाखांचा महसूल जमा
Traffic congestion, Divisional Commissioner office area,
विभागीय आयुक्त कार्यालय परिसरातील वाहतुकीचा बोजवारा, वाहनचालकांना पाच ते दहा किलोमीटरचा वळसा
haryana school bus accident
हरियाणातील स्कूलबस अपघात प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; शाळेच्या मुख्यध्यापिकेसह तिघांना अटक
Nashik, Fraud, developing place,
नाशिक : जागा विकसित करण्याच्या बहाण्याने फसवणूक, सात जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला