01 December 2020

News Flash

महाराष्ट्रात दसऱ्याच्या मुहूर्ताला व्यायामशाळा उघडणार

एसओपीचे काटेकोरपण पालन करण्याचे उद्धव ठाकरे यांनी निर्देश दिले

मागच्या महिन्याभरापासून राज्यामध्ये जीम, व्यायामशाळा सुरु करण्याची मागणी करण्यात येत होती. अखेर राज्य सरकारने ही मागणी मान्य केली आहे. येत्या दसऱ्यापासून राज्यात जीम, व्यायामशाळा सुरु होणार आहेत. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी उपायोजना आणि नियमांचे काटेकोरपणे पालन करुन, राज्यात जीम, फिटनेस सेंटर, व्यायामशाळा सुरु करण्यास मान्यता देत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

परवानगी देत असतानाच एसओपीचे काटेकोरपण पालन करण्याचे उद्धव ठाकरे यांनी निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी आज जीम, फिटनेस सेंटर आणि व्यायाम शाळेंच्या प्रतिनिधींशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. जीम, व्यायामशाळांना परवागनी मिळावी, यासाठी या संघटनेच्या प्रतिनिधींनी कृष्णकुंजवर जाऊन राज ठाकरेंची सुद्धा भेट घेतली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 17, 2020 7:40 pm

Web Title: in maharashtra gym will reopen from dussehra announce by cm uddhav thackeray dmp 82
Next Stories
1 पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाणार सोलापूरला
2 “उद्धव ठाकरेंनी यशोमती ठाकूर यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी”
3 दसरा मेळाव्याला उद्धव ठाकरेंचं भाषण व्यासपीठावरुनच, संजय राऊत यांचं मोठं विधान
Just Now!
X