13 July 2020

News Flash

भारत विरूध्द पाकिस्तान कुस्तीचा महासंग्राम आज पिंगळीच्या माळावर

क्रिकेटप्रमाणे भारत विरूध्द पाकिस्तान असे युध्द कुस्ती शौकीनांना अनुभवता येणार आहे. माण तालुक्यातील पिंगळी येथे कुस्त्यांचा महासंग्राम भरवण्यात आला असून, सातारा जिल्ह्यातील या पहिल्याच आंतरराष्ट्रीय

| March 2, 2014 02:20 am

क्रिकेटप्रमाणे भारत विरूध्द पाकिस्तान असे युध्द कुस्ती शौकीनांना अनुभवता येणार आहे. माण तालुक्यातील पिंगळी येथे कुस्त्यांचा महासंग्राम भरवण्यात आला असून, सातारा जिल्ह्यातील या पहिल्याच आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानासाठी ८ पाकिस्तानी मल्ल येणार आहेत. उद्या रविवारी (२ मार्च) पिंगळी येथील हरणाई सूतगिरणी परिसरात कुस्ती मैदानाचे उद्घाटन राष्ट्रसंत भय्यूजी महाराज यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती हरणाई सूतगिरणी व नियोजित साखर कारखान्याचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख यांनी दिली.
देशमुख म्हणाले, की सातारा जिल्ह्यात प्रथमच कुस्त्यांचे आंतरराष्ट्रीय स्पध्रेला साजेल अशी तयारी सुरू असून, दर्जेदार रोषणाई व फटाक्यांची आतषबाजीत पाहुण्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. हेलिकॉप्टर कॅमेऱ्यासह अत्याधुनिक यंत्रणा मैदानात तैनात करण्यात आली आहे असे देशमुख म्हणाले. कुस्ती क्षेत्रात आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर तयार व्हावेत, माण-खटावच्या मातीचे नाव उज्ज्वल व्हावे, तरूणांनी कुस्तीकडे वळावे यासाठी दरवर्षी आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचे मैदान भरविणार आहे.
दरम्यान, पाकिस्तानी मल्ल दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत. दिल्लीच्या हिंदकेसरी पहिलवान सोनू विरूध्द शेर-ए-पाकिस्तान जाहिद यांची प्रथम क्रमांकाची कुस्ती आहे. द्वितीय क्रमांकाची महाराष्ट्र केसरी समाधान घोडके विरूध्द अन्वर जमन (पाकिस्तान), तृतीय क्रमांकाची महाराष्ट्र चॅम्पियन अमोल फडतरे विरूध्द नसीम भट्ट (पाकिस्तान) चौथ्या क्रमांकाची राजेंद्र सूळ विरूध्द अली (पाकिस्तान), पाचव्या क्रमांकाची महाराष्ट्र चॅम्पियन निलेश लोखंडे विरूध्द उमर मुहम्मद पाकिस्तान, जयदीप गायकवाड विरूध्द भट मुम्मद असाद, नाना खांडेकर विरूध्द सलमान यांच्यात कुस्ती होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 2, 2014 2:20 am

Web Title: india against pakistan wrestling in karad
टॅग Karad,Wrestling
Next Stories
1 पंढरपुरात भेसळयुक्त दुधाचा साठा पकडला
2 कोल्हापुरात जनता बाजारला २० वर्षे मुदतवाढ
3 सिडकोच्या सामंजस्य करारात गुंडाळले गेले भूमिपूजन!
Just Now!
X