भारतीय डॉक्टरचा करोनामुळे दुबईत मृत्यू झाला आहे. डॉ. सुधीर वाशिमकर असं या डॉक्टरांचं नाव आहे. ते ६१ वर्षांचे होते. डॉ. सुधीर वाशिमकर हे मूळचे नागपूरचे होते. डॉ.वाशिमकर हे दुबईतील करोना वॉर्डमध्ये कार्यरत होते. महाराष्ट्रातून ७७ बॅचची डिग्री त्यांनी मिळवली होती. १५ दिवसांपूर्वी त्यांना करोनाची लागण झाली. आज त्यांचा मृत्यू झाला. त्यांना करोनाची लागण झाली तेव्हाच त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आज अखेर त्यांचं निधन झालं. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना व्हेंटिलेटरही लावण्यात आलं होतं.