लोकसत्ता प्रतिनिधी
अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्याापीठाने ‘प्रमोटेड कोविड १९’ प्रकरणी चौकशी सुरू केली आहे. अमरावती येथील श्री शिवाजी कॉलेज ऑफ हॉर्टिकल्चरला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. त्यावर महाविद्याालयाकडून खुलासा सादर करण्यात आल्याची माहिती आहे. या प्रकरणात कृषिमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

बी.एस्सी. सेमिस्टर सहाच्या निकालासंदर्भातील कागदपत्रांवर ‘प्रमोटेड कोविड १९’ उल्लेख असल्याचा प्रकार उघडकीस आला. गुणपत्रिकावरही याचा उल्लेख येईल, या संशयाने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण होऊन नाराजीचे वातावरण निर्माण झाले. सेमिस्टर सहाचा निकालच जाहीर करण्यात आला नसल्याने गुणपत्रिकेवर ‘प्रमोटेड कोविड १९’ चा उल्लेख करण्याचा प्रश्नच नाही, असे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्याापीठाने स्पष्ट केले आहे. विद्यााथ्र्यांचे सरासरी गुण टाकलेला तक्ता महाविद्याालयाकडे पडताळणीसाठी पाठविण्यात आला होता. विद्याापीठांतर्गत येत असलेल्या एकूण ३७ महाविद्याालयांकडे तशी माहिती जूनमध्येच पाठविण्यात आली होती.

अमरावती येथे विद्यार्थ्यांमध्ये ही माहिती उघड झाल्याने गैरसमज पसरला असल्याचे विद्याापीठ प्रशासनाने सांगितले. अंतर्गत मूल्यमापनाद्वारे विद्यार्थ्यांना दिलेल्या सरासरी गुणांची पडताळणी करण्यासाठी महाविद्याालयांना पाठवलेल्या तक्त्यावर ‘प्रमोटेड कोविड १९’ चा उल्लेख आहे. भविष्यामध्ये कोविडचे वर्ष लक्षात येण्यासाठी प्रशासकीय स्तरावर ते करण्यात आले होते. नंतर त्यामध्ये बदलही करण्यात आला आहे. याचा विद्यााथ्र्यांच्या गुणपत्रिकांशी काहीही संबंध नाही, असे विद्याापीठाकडून सांगण्यात आले. या प्रकरणी अमरावती येथील महाविद्याालयाच्या प्राचार्यांना १४ जुलै रोजी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यावर बुधवारी सायंकाळी महाविद्याालयाकडून खुलासा सादर करण्यात आल्याची माहिती आहे. या प्रकरणी विद्याापीठाकडून पुढील चौकशी सुरू आहे.