News Flash

“…हीच का उपकाराची परतफेड?”; नारायण राणेंचा मुख्यमंत्री ठाकरेंना सवाल!

जाणून घ्या, आता नेमकी कोणत्या मुद्यावरून केली आहे जोरदार टीका

या अगोदर देखील नारायण राणेंनी विविध मुद्यांवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलेला आहे. (संग्रहीत छायाचित्र)

राज्यात करोना संसर्गाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाउन प्रक्रिया देखील सुरू झालेली आहे. राज्यातील नवीन करोनाबाधितांची संख्या कमी होत असून, सरकारने लागू केलेले निर्बंधही काही शिथिल केले आहेत. तर, काही जिल्ह्यांमध्ये निर्बंध पूर्णपणे हटवले आहेत. मात्र असे जरी असले तरी अद्यापही सिंधुदुर्ग जिल्हा हा रेड झोनमध्ये आहे. यावरून भाजपा नेते खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधल आहे.

“सिंधुदुर्ग-रत्नागिरीने शिवसेनेला स्थापनेपासून साथ केली, त्याबदल्यात शिवसेनेने करोना काळात सिंधुदुर्गात ९०१ तर रत्नागिरीमध्ये १५६१ मृत्यू दिले. याला संपूर्ण जबाबदार उद्धव ठाकरे आहेत. अशी राणेंनी मुख्यमंत्री ठाकरेंवर थेट टीका केली आहे.

तसेच, “दोन्ही जिल्ह्यात डॉक्टर नाही, नर्स, वार्डबॉय, औषध पुरवठा व ऑक्सिजन नाही. एवढ्या वर्षाच्या निष्ठेनंतर सिंधुदुर्ग व रत्नागिरीच्या पदरी मृत्यू. मुख्यमंत्री हीच का उपकाराची परतफेड?” असा सवाल देखील राणेंनी विचारला आहे.

या अगोदर बुधवारी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नारायण राणेंची भेट घेतली होती, तेव्हा त्यांच्यात सिंधुदुर्गमधील करोना परिस्थितीसह अन्य मुद्यांवर बराचवेळ चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. शिवाय, राणेंनी नुकताच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील करोना स्थितीचा आढावा देखील घेतलेला आहे. यावरूनच त्यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधल्याचे दिसत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 18, 2021 2:59 pm

Web Title: is this respond of favors narayan rane question to chief minister thackeray msr 87
Next Stories
1 “राज्य सरकारने संभाजीराजेंच्या सर्व मागण्या मान्य केल्या, आता मराठा आरक्षण प्रश्न सोडवण्यासाठी केंद्राने पुढाकार घ्यावा”
2 काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवणार का?; बाळासाहेब थोरात म्हणतात…
3 अयोध्या जमीन खरेदी प्रकरण : “भाजपा, RSS आणि केंद्र सरकारने खुलासा करावा”
Just Now!
X