जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने मुंबई गोवा हायवे बंद करण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान घातलं आहे. मात्र आता जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने मुंबई गोवा हायवे बंद करण्यात आला आहे. हा मार्ग दोन्ही बाजूने बंद करण्यात आला आहे. तसेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सुरक्षाही तैनात करण्यात आली आहे. कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी ही काळजी घेतली जाते आहे.

एवढंच नाही तर सुरक्षेचा उपाय म्हणून दापोली महामार्गही बंद करण्यात आला आहे. खेडमधल्या बाजारपेठांमध्येही पाणी शिरलं आहे इतका पाऊस पडतो आहे. जगबुडी नदीची धोक्याची पातळी ६ मीटर आहे. मात्र जगबुडी नदीने ही पातळी ओलांडली आहे. या नदीचं पाणी ६.५ मीटरवर पोहचलं आहे. आज सकाळी सानेनऊच्या सुमारास हे पाणी ७ मीटर पर्यंत पोहचलं होतं. यामुळे बाजार पूल, वड नाका, खाटीक आळी भागही पाण्याखाली गेला आहे.

मागील आठवड्यात अतिवृष्टीमुळे तिवरे धरण फुटलं २० पेक्षा जास्त लोकांचा यामध्ये मृत्यू झाला. आता जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने मुंबई गोवा हायवे बंद ठेवण्यात आला आहे. शेजारच्या गावांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बारा तासांसाठी मुंबई गोवा हायवे बंद ठेवण्यात आला आहे.