19 September 2020

News Flash

मनसेच्या भगव्या झेंड्यामुळे भाजपाच्या पोटात धस्स झालंय-जयंत पाटील

जयंत पाटील यांची भाजपावर टीका

भाजपा हिंदूंची मतं वापरणारी व्होटबँक होती आणि आता मनसेने भगवा झेंडा वापरला असल्याने भाजपाच्या पोटात धस्स व्हायला लागले असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केली आहे.

पत्रकारांनी मनसेचा भगवा आणि भाजपाचे हिंदुत्व यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जयंत पाटील यांनी भाजपाच्या बेगडी हिंदुत्वावर जोरदार टीका केली. भाजपा शरद पवारांना घाबरतो याचं एक उत्तम उदाहरण आहे. गणेश हाकेंनी मनसेवर टीका केली होती. त्याबाबत बोलताना जयंत पाटील यांनी हे वक्तव्य केलं आहे. मनसेसोबत देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली मात्र आता पवारसाहेबांवर आरोप करणं योग्य नाही असेही जयंत पाटील म्हणाले. हिंदुत्वाची मतं फुटू नये एवढंच काम भाजपा करतो की, देशातील आणि महाराष्ट्रातील सर्व समाजांचेही काम करतो असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला. धार्मिकदृष्टया भाजप किती विचार करतो हे हिंदूनाही आता कळून आले आहे असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2020 6:06 pm

Web Title: jayant patil slams bjp on mns flag color scj 81
Next Stories
1 राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल करा अन्यथा….संभाजी ब्रिगेडचा पोलिसांना इशारा
2 पंकजा मुंडे सोमवारी करणार उपोषण
3 मनसेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा खून केला – संभाजी ब्रिगेड
Just Now!
X