News Flash

JSW कंपनीसोबत राज्य शासनाचा ३५ हजार ५०० कोटींचा सामंजस्य करार

ही कंपनी हायड्रो पॉवर व पवन उर्जा क्षेत्रात काम करणार आहे

JSW कंपनीसोबत राज्य शासनाचा ३५ हजार ५०० कोटींचा सामंजस्य करार

नामांकित जेएसड्ब्लू कंपनीने राज्य शासनासोबत आज सुमारे ३५, ५०० कोटी रुपयांच्या गुंतवणूक करारावर स्वाक्षऱ्या केल्या. आज झालेल्या करारांनुसार जेएसडब्ल्यू कंपनी हायड्रो व पवन उर्जा क्षेत्रात काम करणार आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या मंत्रालयातील दालनात सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

यावेळी उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव बलदेव सिंह, विकास आयुक्त हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी अन्बलगन तसेच जेएसड्ब्लू कंपनीचे सहसंचालक प्रशांत जैन, बिझनेस हेड अभय याज्ञिक, प्रविण पुरी आदी उपस्थित होते.

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात सुमारे दीड हजार मेगा वॅट क्षमतेचा हायड्रो पॉवर प्रकल्प सुरू केला जाणार आहे. भिवली धरणावर हा प्रकल्प असेल. यासाठी सुमारे साडे पाच हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. यातून पाच हजार जणांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या रोजगार मिळणार आहे.

कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद, सातारा जिल्ह्यात ५ हजार मेगा वॅट क्षमतेचा पवन उर्जा प्रकल्प सुरू करणार आहे. १८७९ हेक्टर जागेवर हा प्रकल्प असेल. यामध्ये सुमारे ३० हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे.
आज झालेल्या दोन्ही सामंजस्य करारामुळे हजारोंच्या संख्येने प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. प्रकल्प सुरू करण्यासाठी राज्य शासन या कंपनीला सर्व सहकार्य करेल, असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 14, 2021 6:53 pm

Web Title: jsw companys memorandum of understanding with the state government for rs 35500 crore msr 87
Next Stories
1 “करोनामध्येही सरकारला सावकारासारखी वसुली करायचीय, म्हणून हे सगळं नाटक सुरू”
2 “गाल सर्वांनाच रंगवता येतात,” रुपाली चाकणकरांच्या ‘त्या’ टीकेला प्रवीण दरेकरांनी दिलं उत्तर
3 कलाकारांवर टीका करतेवेळी थोडं तरी तारतम्य बाळगा, दरेकरांच्या ‘त्या’ वक्तव्यावर प्रिया बेर्डेंचा संताप
Just Now!
X