अमेरिकेत आढळणारा दुर्मिळ असा ‘ॲलिगेटर’ जातीचा मासा कोल्हापूरमध्ये पंचगंगा नदीत सापडल्याचे समोर आले आहे. किशोर दळवी व रघुनाथ दळवी हे मासेमारी करत असताना त्यांच्या जाळ्यात हा दुर्मिळ मासा अडकला. अशाप्रकारचा दुर्मिळ मासा पंचगंगा नदीत सापडण्याची ही पहिलीच घटना असल्याचे सांगण्यात आले आहे.

सहसा हा ‘ॲलिगेटर’ मासा अमेरिकेत गोड्या पाण्यात आढळून येतो. माशाचे तोंड हे काहीसे मगरीच्या तोंडासारखे दिसते. सुरूवातील मासा जाळ्यात अडकल्यावर हा नेमका कोणता मासा आहे? असा प्रश्न मासेमारी करणाऱ्या दोघांना पडला होता. मात्र नंतर काही जाणकारांना विचारण्यात आल्यावर हा ‘ॲलिगेटर’ जातीचा मासा असल्याचे समोर आले.

plenty of water in koyna dam
विश्लेषण : राज्य दुष्काळात, तरी कोयना धरणात सुरक्षित जलसाठा कसा?
in wardha Water Crisis Hits Bor Sanctuary
वर्धा : जंगलात पाणीटंचाई, प्राण्यांसाठी १५ बोअरवेलचे काम सुरू
trees Thane-Belapur industrial city
हरित पट्ट्याच्या मुळावर एमआयडीसी, २०० झाडांची कत्तल होणार, पर्यावरणवादी संस्थेची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
soil dumping in Pavana
पवना, इंद्रायणी, मुळा नदीच्या पात्रात राडारोडा, महापालिकेकडून दंडात्मक कारवाई