कोकण रेल्वे मार्गावर लांज्याजवळ वेरवली येथे डोंगरातील दगड-माती रुळावर वाहून आल्यामुळे रेल्वे गाडय़ांची वाहतूक गुरुवारी दुपारी विस्कळीत झाली. रेल्वे प्रशासनाने तातडीने तंत्रज्ञ आणि मजूर घटनास्थळी पाठवून दगड-माती दूर केली. त्यानंतर या मार्गावर अतिशय धीम्या गतीने वाहतूक सुरु करण्यात आली आहे.
गेल्याच आठवडय़ात कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक भानूप्रकाश तायल यांच्यासह अभियंत्यांनी रेल्वेमार्गाची तपासणी करुन वाहतुकीच्या दृष्टीने हा मार्गा सुरक्षित असल्याचे सांगितले होते. दरडी किंवा दगड-माती रेल्वे मार्गावर येऊ नये यासाठी उपाययोजना केली असल्याचेही त्यांनी सांगितले होते. मात्र, त्यांच्या या उपाययोजना फोल ठरल्याचे दिसत आहे.