सांगोला तालुक्यात वाडेगाव येथे गेल्या आठवडय़ात शेतात विहीर खोदताना त्याभोवतालचे गोलाकार सिमेंटचे रिंगण कोसळल्याने व मातीच्या ढिगा-याखाली गाडले गेल्याने सात मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना शुक्रवारी पुन्हा याच वाडेगावात शेतात बांधण्यात येणारा बंधारा कोसळून दगड-मातीच्या ढिगा-याखाली गाडले जाऊन एका मजुराचा मृत्यू झाला, तर अन्य दोघे मजूर जखमी झाले. विठ्ठल वसंत जाधव (वय ४५, रा. इंडी, जि. विजापूर) असे मृताचे नाव आहे.