News Flash

महाबळेश्वरला पर्यटकांची मोठी गर्दी

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रासह विविध राज्यांमधून येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत आहे.

नाताळ सुटी आणि नवीन वर्षांच्या स्वागताच्या निमित्ताने महाबळेश्वर पर्यटन स्थळ पुन्हा पर्यटकांनी फुलून गेलेले आहे. येथील प्रसिद्ध वेण्णा तलावावर  नौकाविहारासाठी पर्यटकांनी केलेली गर्दी.       (छाया : संजय दस्तुरे)

वाई : शालेय सहली व पर्यटकाच्या गर्दीमुळे महाबळेश्वर सध्या गजबजून गेले आहे. मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रासह विविध राज्यांमधून येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत आहे. सध्या सहली देखील मोठय़ा प्रमाणात येत आहेत. येथे आता थंडीचा कडाका वाढत आहे. या थंडीसोबतच येथील निसर्गसौंदर्य पाहण्याचा आनंद पर्यटक लुटत आहेत.

डिसेंबर महिन्यात महाराष्ट्राच्या विविध भागांमधून मोठय़ा प्रमाणात शालेय सहली व पर्यटक महाबळेश्वर येथे येत असतात. यामुळे मुख्य बाजारपेठ परिसर विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी गजबजून गेला आहे. येथील केट्स पॉइंट, ऑर्थरसीट पॉइंट, विल्सन, मुंबई पॉइंट, क्षेत्र महाबळेश्वर, लॉडविक पॉइंट, लिंगमाळा धबधबा, श्री क्षेत्र महाबळेश्वर मंदिर, किल्ले प्रतापगड येथे पर्यटक गर्दी करीत आहेत. ऐन थंडीत देखील पर्यटक येथील प्रसिद्ध स्ट्रोबेरी जूस, Rीम,आइस्Rीम, आइस गोळ्यावर ताव मारताना दिसत आहेत.

नौकाविहारासाठी प्रसिद्ध असलेला वेण्णा लेक गर्दीने फुलून गेला असून पर्यटक नौकाविहाराबरोबर घोडेस्वारीचा आनंद लुटताना पाहावयास मिळत आहेत. सोबतच वेण्णा लेक चौपाटीवर चमचमीत-चटपटीत पदार्थावर ताव मारला जात आहे. गुलाबी थंडीत वेण्णा लेक वरील निसर्गसौंदर्य व सूर्यास्ताच्या वेळी दिसणारी निसर्गाच्या विविध आकर्षक छटा अनुभवताना पर्यटक पाहावयास मिळत आहेत.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2019 4:26 am

Web Title: large crowd of tourists at mahabaleshwar zws 70
Next Stories
1 उद्धव ठाकरे नामधारी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे प्रतिपादन
2 महाड प्राचार्यपदावरू न हाणामारी प्रकरणी चौघांना पोलीस कोठडी
3 राज्यभरात गारठा वाढला
Just Now!
X