तत्त्वासाठी कधीही तडजोड न करणारा एक वर्ग पूर्वीपासून प्रसिद्ध होता, मात्र कालांतराने यात बदल होत असून सभोवतालच्या वातावरणाचा परिणाम आता नतिकतेचा डांगोरा पिटणाऱ्यांवरही होताना दिसून येत आहे. जो तो आपण कसे मागास आहोत, आपल्या जातीला, पंथाला दुर्लक्षित कसे केले जाते व शासनाने त्यासाठी कशा सोयीसुविधा देण्याची गरज आहे हे पटवून देण्यासाठी आटापिटा करत असतो.

जगात हिंदू हा एकमेव धर्म असून बाकी सारे पंथ आहेत, अशी भूमिका मांडणारा एक वर्ग आहे तर हिंदू ही जीवनपद्धती आहे. त्याला केवळ एक धर्मगुरू, एक ग्रंथ असे मर्यादित स्वरूप नाही, असे मांडणारा एक वर्ग आहे. हिंदू धर्माचा भाग म्हणवणाऱ्या जैन, शीख या पंथाला विशेष धर्म म्हणून मान्यता मिळाली. वर्षांनुवष्रे वीरशैव समाज (लिंगायत समाज) हा हिंदू धर्मातील शिवाला मानणारा पंथ अशी त्याची ओळख होती. देशभर या पंथाचे लोक आहेत. पाच धर्मपीठे आहेत. गेल्या वर्षभरापासून लिंगायत हा स्वतंत्र धर्म आहे. हिंदू धर्माशी त्याचा काही एक संबंध नाही व या धर्माला स्वतंत्र धर्माचा दर्जा मिळावा या मागणीसाठी मोच्रे, आंदोलने सुरू झाले आहेत.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रातील लातूर, सांगली, औरंगाबाद, कर्नाटकातील गुलबर्गा आदी ठिकाणी मोठय़ा संख्येनेचे मोच्रे काढण्यात आले. प्रारंभी मराठा समाजाच्या मोर्चाची ही प्रतिक्रिया आहे असे मानणारा एक वर्ग होता मात्र कसल्याही स्थितीत लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्माचा दर्जा मिळावा यासाठी हे आंदोलन निर्णायक टप्प्यापर्यंत पोहोचवले जाईल व मागण्या मान्य करून घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, असा इशारा या मोर्चाचे नेतृत्व करणारे अहमदपूर येथील डॉ. शिविलग शिवाचार्य महाराज यांनी दिला. डॉ. शिविलग शिवाचार्य महाराज हे स्वातंत्र्यपूर्वकाळात रा. स्व. संघाचे पंजाब प्रांतात प्रचारक होते. संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समवेत त्यांनी काम केले. अनेक भाषांवर त्यांचे प्रभुत्व आहे व त्या काळात एमबीबीएसची पदवी त्यांनी प्राप्त केली. अतिशय विद्वान व्यक्ती म्हणून त्यांची ख्याती आहे.

दोन वर्षांपूर्वी त्यांनी वयाची शंभरी पूर्ण केल्यानंतर अनेक कार्यक्रम जन्मशताब्दी वर्षांनिमित्त त्यांच्या भक्तांनी घेतले. त्याच्या सांगता समारंभासाठी दस्तुरखुद्द रा. स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित राहिले व त्यांनी शिविलग शिवाचार्य महाराज यांच्या कार्याचे, त्यांच्या आचरणाचे कौतुक केले तोपर्यंत शिवाचार्य महाराज हे रा. स्व. संघाची जी भूमिका आहे तीच भूमिका सातत्याने ठिकठिकाणी मांडत असत. मात्र शंभरी उलटल्यानंतर डॉ. शिविलग शिवाचार्य महाराज यांनी आपणच मांडलेल्या भूमिकेत बदल केला व ते लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्माचा दर्जा मिळावा यासाठी मोर्चात अग्रभागी दिसू लागले. आमच्या मागण्याला जी मंडळी पाठिंबा देणार नाहीत त्यांना सत्तेतून खाली खेचू इतकी ताकद आमची आहे. कर्नाटक, आंध्र व महाराष्ट्र या तीन प्रांतात सत्ताबदल करण्याइतका लिंगायत धर्मीयांचा वरचष्मा असल्याचे ते उघडपणे सांगतात. कर्नाटकातील सरकारने लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्यात यावा, असा ठराव करून तो केंद्राकडे पाठवला. त्याच पद्धतीने अन्य प्रांतात सत्तेवर असणाऱ्या मंडळींनी ठराव करून पाठवावा. केंद्र सरकारने याबाबतची आपली भूमिका मांडावी असे आग्रहपूर्वक प्रतिपादन त्यांनी केले.

संघाच्या भूमिकेच्या विरोधात शिविलग शिवाचार्य महाराज आपले म्हणणे मांडत असल्यामुळे त्यांना मानणाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. शिविलग शिवाचार्य महाराजांचे समाजातील स्थान पाहता त्यांच्या विरोधात बोलण्याचे धाडस कोणी दाखवत नाही मात्र भाजपाने काँग्रेस धर्माचे राजकारण करीत आहे, अशी भूमिका मांडत लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्यासाठी भाजपा इच्छुक नसल्याचे जाहीर केले व त्यानंतर संघसंबंधित मंडळीही यासंबंधी बोलू लागली आहेत. शिविलग शिवाचार्य महाराज यांनी लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्माचा दर्जा मिळावा यासंबंधी रान उठवण्याचा प्रयत्न चालवला असला तरी वीरशैव समाजातील अध्वर्यू समजले जाणारे पाचही पिठाचे जगद्गुरू या भूमिकेच्या विरोधात आहेत. शिवाला मानणारे देशभर अनेक लोक आहेत. ते हिंदू धर्मीय आहेत. स्वतंत्र धर्माची मान्यता मिळवून शासकीय आरक्षणाचा लाभ उठवता येईल अशा बाबींसाठी कोणी चुकीची भूमिका मांडत असेल तर त्याला विरोध केला जाईल. सच्चे वीरशैव ही भूमिका स्वीकारणार नसल्याचे म्हटले आहे. कर्नाटक निवडणुकीच्या निकालानंतर लिंगायत समाजाची नेमकी भूमिका काय आहे हे काही प्रमाणात स्पष्ट होईल. लिंगायत धर्माचा मुद्दा किमान लोकसभा निवडणुकीपर्यंत पुढे रेटला जाईल असे सध्याचे चित्र आहे.

शिवाचार्याच्या भूमिकेचा खेद वाटतो : लातुरे

रा. स्व. संघाचे लातूर जिल्हय़ाचे माजी संघचालक व संघाचे ज्येष्ठ कार्यकत्रे वैजनाथअप्पा लातुरे यांनी शिविलग शिवाचार्य महाराज यांचे वीरशैव समाजात मोठे स्थान आहे. आयुष्यभर त्यांनी हिंदू धर्म हा श्रेष्ठ आहे व त्या धर्माअंतर्गत वीरशैव हा पंथ आहे ही भूमिका मांडली होती. वयाची शंभरावी उलटल्यानंतर ते आपणच मांडलेल्या भूमिकेच्या नेमके विरोधात बोलत आहेत. त्यांच्या या भूमिकेमुळे आपल्याला अतिशय खेद वाटत असल्याचे ते म्हणाले.

शिवाचार्य महाराजांचा राजकारणासाठी वापर : उमाकांत होनराव

डॉ. शिविलग शिवाचार्य महाराज जन्मशताब्दी महोत्सव समितीचे अध्यक्ष उमाकांत होनराव यांनी विविध उपक्रम राबवले त्यासाठी लाखो मंडळींना संघटित केले. वयाच्या सातव्या वर्षी शिविलग शिवाचार्य महाराज यांच्याकडून आपण दीक्षा घेतली होती त्यामुळे त्यांची शिवभक्ती, त्यांचा विविध विषयातील गाढा अभ्यास याबद्दल आपल्याला नितांत आदर आहे. लिंगायत हा हिंदू धर्माचा अविभाज्य भाग आहे. तो स्वतंत्र धर्म नाही अशी भूमिका देशातील पाचही पिठाचे शिवाचार्य महाराज यांनी मांडली आहे. काशी पिठाचे जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर महाराज यांनी याचे नेतृत्व केले. शिविलग शिवाचार्य महाराज हे शंभरी उलटल्यानंतर वेगळी भूमिका का मांडत आहेत? ते मांडत असलेल्या भूमिकेचा राजकीय मंडळी गरवापर करत आहेत. त्यांच्याबद्दल अपार श्रद्धा असली तरी त्यांनी मांडलेली भूमिका अतिशय चुकीची असून त्या भूमिकेबद्दल आपली असहमती असल्याचे होनराव यांनी सांगितले.