12 August 2020

News Flash

विधान परिषदेच्या लातूर, उस्मानाबाद, बीड मतदारसंघांतील काँग्रेसची सद्दी संपणार?

या मतदारसंघांत भाजपला पडती बाजू घ्यावी लागत होती.

संग्रहित प्रतिनिधिक छायाचित्र

विधान परिषदेच्या लातूर, उस्मानाबाद, बीड या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांतील निवडणूक पुढील वर्षी होणार असली तरी त्याची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. या मतदारसंघांवर डोळा असलेल्या इच्छुकांनी आपले पारडे कसे जड होईल या दृष्टीने चाचपणी सुरू केली आहे.

सध्या या मतदारसंघांचे प्रतिनिधित्व काँग्रेसचे दिलीप देशमुख हे करतात. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे बंधू दिलीपराव या मतदारसंघांतून तिनदा निवडून आले आहेत. गेल्या काही वर्षांत लातूर, उस्मानाबाद व बीड या तिन्ही जिल्हय़ांत काँग्रेस, राष्ट्रवादीचा वरचष्मा होता. भाजप तिसऱ्या क्रमांकावरील पक्ष होता. त्यामुळे या मतदारसंघांत भाजपला पडती बाजू घ्यावी लागत होती. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद, नगर परिषद, पंचायत समिती या निवडणुकांत भाजपने जबरदस्त घोडदौड केली आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लातुरात भाजपने मोठे धक्के देत जवळपास सर्वच संस्थांवर ताबा मिळवत पहिला क्रमांक पटकावला आहे. सध्या काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर आहे. राष्ट्रवादी तिसऱ्या, तर शिवसेना चौथ्या क्रमांकावर आहे. बीड जिल्हय़ात राष्ट्रवादी काँग्रेस क्रमांक १ चा पक्ष असला तरी भाजप मित्रपक्षासह त्यांच्या बरोबरीत आहे. काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर आहे.

उस्मानाबाद जिल्हय़ात राष्ट्रवादी, शिवसेना यांची ताकद चांगली आहे. काँग्रेस तिसऱ्या, तर भाजप चौथ्या क्रमांकावर आहे. तीन जिल्हय़ांतील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सभापती, नगरसेवक, नगर पंचायत सदस्य यांची संख्या लक्षात घेता भाजप पहिल्या क्रमांकावरील पक्ष आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी या दोघांची गोळाबेरीज केली तर ते दोघे भाजपला वरचढ आहेत. या मतदारसंघात राष्ट्रवादीने कायम काँग्रेसला पािठबा देत ही जागा विलासरावांचे बंधू दिलीपरावांसाठी सोडली होती. अर्थात मिळालेल्या संधीचा दिलीपरावांनी पुरता लाभ उठवला. आता राजकीय चित्र बदलले आहे. काँग्रेस बॅकफूटवर आहे. राज्य व केंद्रात सत्तेत असलेली भाजप आक्रमक आहे. भाजपतर्फे बीड जिल्हय़ातील माजी आ. सुरेश धस, रमेश आडसकर, लातूर जिल्हय़ातील भाजप प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, लातूर ग्रामीणचे रमेश कराड, उस्मानाबादचे मििलद पाटील यांची नावे चच्रेत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे बीडचे भारतभूषण क्षीरसागर, प्रकाश साळुंके, उस्मानाबादचे जीवनराव गोरे, अमोल पाटोदकर हे आपले नाव रेटत आहेत. दिलीपराव देशमुख पुन्हा चौथ्यांदा या मतदारसंघात प्रतिनिधित्व करता येण्यासाठी प्रयत्न करणार का? त्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावणार का? व त्यांच्या पाठीमागे आता पक्षातील कोणता नेता उभा राहणार? अशी चर्चा सुरू आहे. तर भाजपने वर्षांनुवष्रे या निवडणुकीत पत्कराव्या लागलेल्या पराभवाचा वचपा काढत हा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेण्याची व्यूहरचना सुरू केली आहे. बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे व लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्यात सामंजस्य झाले व एकदिलाने निवडणूक लढवण्याचे ठरवले तर भाजपला या वेळी निवडणूक जिंकण्याची चांगली संधी आहे.

एकापाठोपाठ एक निवडणुका जिंकण्याचा सपाटा भाजपने लावलेला असल्यामुळे या निवडणुकीतही भाजप आपली पूर्ण शक्ती पणाला लावेल असे भाजपच्या गोटातून सांगितले जात आहे. आणखीन आठ महिने निवडणुकीचा कालावधी असला तरी आतापासूनच पटावर सोंगटय़ा ठेवण्याची तयारी सुरू आहे.

उस्मानाबाद जिल्हय़ात राष्ट्रवादी, शिवसेना यांची ताकद चांगली आहे. काँग्रेस तिसऱ्या, तर भाजप चौथ्या क्रमांकावर आहे. तीन जिल्हय़ांतील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सभापती, नगरसेवक, नगर पंचायत सदस्य यांची संख्या लक्षात घेता भाजप पहिल्या क्रमांकावरील पक्ष आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी या दोघांची गोळाबेरीज केली तर ते दोघे भाजपला वरचढ आहेत.

सन्मानपूर्वक माघार?

आमदार दिलीपराव देशमुख यांनी लातूर, उस्मानाबाद, बीड या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांत शिवसेनेकडे जागा असताना पहिल्यांदा बिनविरोध, त्यानंतर भाजपकडे जागा आल्यानंतर संजय िनबाळकर व सुधीर धुत्तेकर या दोन उमेदवारांचा दारुण पराभव केला होता. महाराष्ट्रात प्रचंड मताने विजय मिळवण्याचा सन्मान दिलीपरावांच्या खात्यावर जमा आहे. सलग तीन वेळा निवडून आल्यानंतर आता ते या निवडणुकीतून सन्मानपूर्वक माघार घेतील की चौथ्यांदा आपले नशीब पुन्हा एकदा अजमावण्यासाठी प्रयत्न करतील? यावरही बरेच जण खल करत असून दिलीपराव देशमुख सन्मानपूर्वक माघार घेतील. काळानुरूप पावले टाकण्यात ते माहीर आहेत. उगाच हात दाखवून अवलक्षण ते करणार नाहीत, असेही काही जणांचे म्हणणे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2017 3:28 am

Web Title: local bodies elections in latur osmanabad beed maharashtra legislative council election
Next Stories
1 विद्यापीठ नामांतराच्या वादामुळे सोलापूरचे सामाजिक वातावरण गढूळ
2 उस्मानाबादमध्ये विहिरीत सापडले एकाच कुटुंबातील चार महिलांचे मृतदेह
3 दाऊद आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा संबंध नाही: मलिक
Just Now!
X