दहावी आणि बारावीच्या ८५ टक्के उत्तरपत्रिका तपासण्याचं काम पूर्ण झालं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्यांना निकालासाठी यावर्षी वाट बघावी लागते आहे कारण करोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. अशात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे पुढील महिन्यात निकालाची तारीख जाहीर होऊ शकते. दहावीच्या ८५ टक्के उत्तर पत्रिका तपासण्यात आल्या आहेत असं स्पष्ट करण्यात आलं आहे. तर बारावीच्याही ८५ टक्के उत्तर पत्रिका तपासण्यात आल्या आहेत असंही वृत्त आहे.

१० वी किंवा १२ वी च्या निकालांची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. १० जूनला निकाल जाहीर केला जाईल अशी चर्चा होती. मात्र तसे झालेले नाही. आता शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे पुढील महिन्यात निकालाच्या तारखा जाहीर होऊ शकतात. सध्याच्या घडीला शिक्षकांना प्रवास करण्यास अडचणी येत आहेत. कारण सार्वजनिक वाहतूक लॉकडाउन असल्यामुळे बंद आहे. तसंच दहावीचा भुगोलाचा पेपर रद्द करण्यात आला होता. त्यामुळे सगळ्या विषयांची सरासरी काढून गुण दिले जाणार आहेत. इंडिया टुडेने या संदर्भातले वृत्त दिले आहे.