महाविकास आघाडी सरकारचे बहुप्रतीक्षित खातेवाटप लवकरच जाहीर होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी खातेवाटपाची यादी राज्यपालांकडे पाठवली असून राज्यपालांचं शिक्कामोर्तब झाल्यानंतर खातेवाटप जाहीर होईल”, असे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांनी काल (दि.४) ट्विटरद्वारे जाहीर केलं होतं. त्यानंतर रात्री उशीरापर्यंत खातेवाटप जारी झालं नाही, पण अखेर शिवसेनेच्या ‘सामना’ वृत्तपत्रातून आज(दि.५) संभाव्य खातेवाटपाची यादी जाहीर करण्यात आली आहे. यासोबतच, राज्यपालांच्या ‘विश्रांतीयोगा’मुळे मंत्रिमंडळाचे खातेवाटप पुन्हा रखडल्याची टीका सामनामधून करण्यात आली आहे.

सामनातील संभाव्य यादीनुसार, विधानसभेत पहिल्यांदाच निवडून आल्यानंतर कॅबिनेट मंत्री बनलेले आदित्य ठाकरे यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन या खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. तर, एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास व राज्य रस्ते विकास महामंडळ ही खाती देण्यात आली असून, अजित पवार यांच्याकडे अर्थ व नियोजन खात्याचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. गृहखाते अनिल देशमुख यांना देण्यात आले आहे. बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल; तर अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

“राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचे खातेवाटप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल केले. खातेवाटपाची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या मंजुरीसाठी रात्री 9.45 वाजता राजभवनवर रवानाही करण्यात आली. राज्यपाल तत्काळ स्वाक्षरी करतील अशी अपेक्षा होती. मात्र राज्यपाल विश्रांती घेत असल्याने ते उद्या सकाळीच या यादीवर मंजुरीची स्वाक्षरी करतील असे सांगण्यात आले. राज्यपालांच्या ‘विश्रांतीयोगा’मुळे मंत्रिमंडळाचे खातेवाटप पुन्हा रखडले”, अशी टीका राज्यपालांवर सामनामधून करण्यात आली आहे. त्यासोबतच संभाव्य खातेवाटपाची यादीही जाहीर करण्यात आली आहे.

  • एकनाथ शिंदे  नगरविकास, एमएसआरडीसी
  • सुभाष देसाई  उद्योग
  • आदित्य ठाकरे  पर्यावरण, पर्यटन, राजशिष्टाचार
  • संजय राठोड  वने
  • अनिल परब  परिवहन, संसदीय कार्य
  • उदय सामंत  उच्च व तंत्रशिक्षण
  • दादा भुसे  कृषी
  • गुलाबराव पाटील  पाणीपुरवठा
  • संदीपान भुमरे – रोजगार हमी, फलोत्पादन
  • शंकरराव गडाख  जलसंधारण
  • अजित पवार  उपमुख्यमंत्री, अर्थ
  • अनिल देशमुख  गृह
  • जयंत पाटील  जलसंपदा
  • छगन भुजबळ  अन्न व नागरी पुरवठा
  • दिलीप वळसे पाटील  उत्पादन शुल्क
  • धनंजय मुंडे  सामाजिक न्याय
  • नवाब मलिक  अल्पसंख्याक
  • बाळासाहेब पाटील  सहकार
  • जितेंद्र आव्हाड  गृहनिर्माण
  • हसन मुश्रीफ  ग्रामविकास
  • राजेश टोपे  सार्वजनिक आरोग्य
  • बाळासाहेब थोरात  महसूल
  • अशोक चव्हाण  सार्वजनिक बांधकाम
  • नितीन राऊत  ऊर्जा
  • वर्षा गायकवाड  शालेय शिक्षण
  • के . सी. पाडवी – आदिवासी विकास
  • अमित देशमुख  वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक
  • विजय वडेट्टीवार  मदत व पुनर्वसन, खार जमीन
  • यशोमती ठाकूर  महिला व बालविकास
  • अस्लम शेख  बंदरे, वस्त्राsद्योग, मत्स्य संवर्धन
  • सुनील केदार  दुग्धविकास आणि पशुसंवर्धन

राज्यमंत्री

  • शंभुराजे देसाई  गृह (ग्रामीण), अर्थ, वाणिज्य
  • सतेज पाटील  गृह (शहर)
  • बच्चू कडू – जलसंपदा, शालेय शिक्षण, कामगार
  • राजेंद्र यड्रावकर  आरोग्य, अन्न व नागरी पुरवठा, सांस्कृतिक
  • दत्तात्रय भरणे  जलसंधारण
  • अदिती तटकरे  उद्योग, पर्यटन, क्रीडा
  • संजय बनसोडे  पर्यावरण, पाणीपुरवठा, सार्वजनिक बांधकाम
  • प्राजक्त तनपुरे  नगरविकास, ऊर्जा, उच्च व तंत्रशिक्षण
  • विश्वजित कदम  कृषी आणि सहकार
  • अब्दुल सत्तार –महसूल आणि ग्रामविकास