21 October 2020

News Flash

एसईबीसी प्रवर्गातील आरक्षणानुसार 13 टक्के नियुक्त्या जाहीर

सार्वजनिक बांधकाम विभाग आघाडीवर

राज्य शासनाने सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गाला (एसईबीसी) दिलेल्या 13 टक्के आरक्षणानुसार नोकरीमध्ये नियुक्त्या देण्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गट ‘ब’ मधील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) संवर्गातील रिक्तपदांवर मराठा समाजातील 34 जणांची एसईबीसी प्रवर्गातील 13 टक्के कोट्यातून नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम खाते एसईबीसी आरक्षणाची राज्यात प्रथम अमंलबजावणी करणारा विभाग ठरला आहे.

मराठा समाज आरक्षण कायदा नोव्हेंबर २०१८ मध्ये लागू झाल्यानंतर शासनाने हा महाभरतीचा निर्णय घेतला. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदांच्या जागा भरण्यासाठी प्रक्रिया सुरू केली. न्यायालयाने नोकऱ्यांमध्ये एसईबीसी प्रवर्गातून 13 टक्के आरक्षण देण्याचा निकाल दिला. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये 31 डिसेंबर 2019 पर्यंत रिक्त होणाऱ्या 405 संभाव्य पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर 300 पदांचे आदेश काढण्यात आले असून यामध्ये एसईबीसी प्रवर्गातील 34 उमेदवारांना नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यात मराठा समाजासाठी सामाजिक व शैक्षणिक मागास आरक्षण लागू झाल्यानंतर सुरू केलेल्या भरती प्रक्रियेत सार्वजनिक बांधकाम विभागाने पुढाकार घेतला आहे. इतर पदांसाठीच्या भरती प्रक्रियेमध्येही मराठा समाजासाठीच्या एसईबीसी प्रवर्गातील इतर रिक्त पदे देखील तातडीने भरण्याची कार्यवाही सुरु आहे, असे सार्वजनिक बांधकाम, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2019 6:24 pm

Web Title: maharashtra government 13 percent reservation sebc pwd chandrakant patil jud 87
Next Stories
1 मी दहशतवादी असेन तर अटक का केली जात नाही ? – दिग्विजय सिंह
2 मराठा आरक्षणाला तूर्तास स्थगिती नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून राज्य सरकारला दिलासा
3 अमृता फडणवीसांच्या ट्वीटनंतर मुंबई पोलिसांनी ‘त्या’ अभिनेत्रीला केलं अनब्लॉक
Just Now!
X