कृष्णा नदीच्या पाणी पुनर्वाटपावरुन आंध्र प्रदेशने  नव्याने दिलेल्या निर्णयाचा महाराष्ट्र आणि कर्नाटक एकत्रितरित्या विरोध करणार आहे असं कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात ठरले आहे. कृष्णा नदीच्या प्रश्नावरुन आंध्रप्रदेश आणि तेलंगण यांच्याविरोधात महाराष्ट्र-कर्नाटकची युती झाली आहे. आजच कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या निवासस्थानी भेट दिली. त्यावेळी अलमट्टी धरणातील पाणी सोडण्यावरुनही चर्चा झाल्याचं समजतं आहे.

देवेंद्र फडणवीस आणि येडियुरप्पा यांनी संयुक्तपणे आंध्रप्रदेशच्या निर्णयाला विरोध करण्याचे ठरवले आहे. कृष्णा नदीच्या पाणी पुनर्वाटपा संदर्भात जो निर्णय आंध्रने घेतला आहे त्याला आता महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारने एकत्रितरित्या विरोध करायचे ठरवले आहे.

वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. गणपतीच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा आले होते. कर्नाटकचे उप मुख्यमंत्री डॉ. सी. एन. अश्वत्थनारायणन आणि कर्नाटकचे गृहमंत्री बसवराज हेदेखील येडियुरप्पा यांच्यासोबत आले होते. यावेळी महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचीही उपस्थिती होती.

कोल्हापूर, सांगलीमध्ये महापूर आला होता. त्यातून महाराष्ट्र सावरतो आहे. मात्र भविष्यात अशी स्थिती उद्भवू नये यासाठी या दोघांमध्ये अलमट्टी धरणावरुनही चर्चा झाल्याचं समजतं आहे.