04 March 2021

News Flash

‘महाराष्ट्र क्रांती सेना’ लोकसभा-विधानसभेच्या सर्व जागा लढवणार

साताऱ्याचे खासदर उदयनराजे भोसलेंनी 'महाराष्ट्र क्रांती सेने'कडून आगामी निवडणूक लढवावी अशी अपेक्षा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली.

आरक्षणासाठी राज्यभर भव्य मोर्चे काढणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाचे निमंत्रक सुरेश पाटील यांनी नव्या महाराष्ट्र क्रांती सेना या राजकीय पक्षाची स्थापना केली. आता हा पक्ष आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा सोमवारी कोल्हापूर येथे करण्यात आली.

भव्य मराठा मोर्चे काढल्यानंतर यंदाच्या दिवाळीत महाराष्ट्र क्रांती सेनेची रायरेश्वर येते स्थापना करण्यात आली. या पक्षाकडून आगामी निवडणुकीत राज्यातील लोकसभेच्या ४८ आणि विधानसभेच्या २८८ जागा लढवण्यात येणार आहेत. सोमवारी कोल्हापूरात याची अधिकृत घोषणा करण्यात आली.

दरम्यान, साताऱ्याचे खासदर उदयनराजे भोसले हे जर राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवणार नसतील तर महाराष्ट्र क्रांती सेनेकडून लढवतील अशी अपेक्षा आणि विश्वास पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली.

मराठा क्रांती मोर्चातून निर्माण झालेल्या ‘महाराष्ट्र क्रांती सेना’ या पक्षाला मराठा समाजाचाच विरोध आहे. मागण्या मान्य करून घेण्यासाठी समाज सक्षम असून यासाठी कोणत्याही राजकीय पक्ष्याच्या स्थापनेची गरज नाही. राजकीय पक्ष स्थापून समाजाच्या आंदोलनाला वेगळी दिशा देण्याचा कोणताही प्रयत्न यशस्वी होऊ दिला जाणार नाही. वेगळा राजकीय पक्ष स्थापन करणारे सरकारचे हस्तक असून त्यांची राजकीय उठबस व पार्श्वभूमी विचारात घ्यावी लागेल, असे मराठा क्रांती ठोक मोर्चाचे जेष्ठ पदाधिकारी बापूसाहेब शिरसाट व नानासाहेब माशेरे यांनी म्हटले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2018 1:37 pm

Web Title: maharashtra kranti sena will contest all the seats of the lok sabha vidhan sabha
Next Stories
1 वस्त्रोद्योगात मंदीचा झाकोळ, नव्या वर्षांत आर्थिक आव्हाने
2 गोविंद पानसरे हत्येप्रकरणी अमोल काळेला कोठडी
3 कोल्हापूरमध्ये ‘नो शेव्ह नोव्हेंबर’ मोहीम!
Just Now!
X