राज्यात करोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. अशातच मुंबईतील करोनाग्रस्तांची संख्याही झपाट्यानं वाढत आहे. काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील करोनाची परिस्थिती ठाकरे सरकारच्या हाताबाहेर गेल्याचा आरोप केला होता. त्यानंतर सरकार सर्वच ठिकाणी अपयशी ठरल्याचं म्हणत भाजपानं राज्यभरात सरकारविरोधात आंदोलनही केलं होती. दरम्यान, काही महाराष्ट्रद्रोही मुंबईला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचं वक्तव्य गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलं.

आणखी वाचा- … आणि गद्दारांना महाराष्ट्र माफ करत नाही; जितेंद्र आव्हाडांचा भाजपावर हल्लाबोल

“मुंबईचे मॉडेल देशभर राबवा. हे देशासमोरील सर्वोत्तम उदाहरण आहे, असं नीति आयोगानं आणि आयसीएमआरनं म्हटलं आहे. तर दुसरीकडे गुजरातमधील रुग्णालयांची अवस्था अंधार कोठडीपेक्षाही बिकट आहे, असं गुजरात न्यायालयानं म्हटलं आहे. तरी काही महाराष्ट्रद्रोही मुंबईला बदनाम करत आहेत,” असं आव्हाड म्हणाले. त्यांनी ट्विटरवरून आपली प्रतिक्रिया दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबईतील करोनाची परिस्थिती ठाकरे सरकारच्या हाताबाहेर गेल्याचं चित्र सध्या दिसतं आहे अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. महाराष्ट्रात करोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. महाराष्ट्रातही मुंबईत करोना रुग्णांची संख्या ही सर्वाधिक आहे. अशा स्थितीत ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यात ठाकरे सरकार अपयशी ठरलं आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री नवीन त्यांना प्रशासकीय अनुभव नाही. पहिल्या लॉकडाउनपासून धोरणात्मक निर्णय घेण्यात या सरकारने चुका केल्या असंही फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटलं होतं. तसंच काही दिवसांपूर्वी विरोधकांनी राज्यभर सरकारविरोधात आंदोलनही केलं होतं.