25 February 2021

News Flash

राज्यात दिवसभरात १३ हजार ७१४ जणांची करोनावर मात

जाणून घ्या, दिवसभरात किती नवे करोनाबाधित आढळले.

संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र

राज्यातील करोना संसर्गाचे प्रमाण हळूहळू कमी होताना दिसत आहे. याचबरोबर, करोनावर मात करणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. राज्यात आज दिवसभरात १३ हजार ७१४ जणांनी करोनावर मात केली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट ८५.४ टक्क्यांवर पोहचला आहे. तर, आज राज्यात १० हजार २२६ नवे करोनाबाधित आढळले असून, ३३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता १५ लाख ६४ हजार ६१५ वर पोहचली आहे.

राज्यातील एकूण १५ लाख ६४ हजार ६१५ करोनाबाधितांमध्ये १ लाख ९२ हजार ४५९ अॅक्टिव्ह केसेस, डिस्चार्ज मिळालेले १३ लाख ३० हजार ४८३ जण व आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्या ४१ हजार १९६ जणांच्या संख्येचा समावेश आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.

सद्यस्थितीस राज्यात २३ लाख २७ हजार ४९३ जण गृहविलगीकरणात आहेत. तर, २३ हजार १८३ जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

आजपर्यंत तपासणी झालेल्या ७९ लाख १४ हजार ६५१ नमून्यांपैकी १५ लाख ६४ हजार ६१५ नमूने (१९.७१ टक्के) करोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2020 9:08 pm

Web Title: maharashtra reports 10226 new covid19 cases and 337 deaths msr 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 पोलीस मारहाण प्रकरणी मंत्री यशोमती ठाकूर यांना तीन महिन्यांची शिक्षा
2 खुजी माणसं…; कलाम यांना अभिवादन करताना गृहमंत्र्यांचा राज्यपालांना टोला
3 पुरोगामी महाराष्ट्र शासन आता हळूहळू प्रतिगामी व्हायला लागलं – प्रकाश आंबेडकर
Just Now!
X