News Flash

Coronavirus : राज्यात दिवसभरात ४८ हजार २११ रूग्ण करोनामुक्त; रिकव्हरी रेट ९०.१९ टक्के!

आज २६ हजार ६१६ नवीन करोनाबाधितांची नोंद; ५१६ रूग्णांचा मृत्यू

(संग्रहित छायाचित्र)

राज्यात आता दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या ही सातत्याने अधिक आढळून येत लागली आहे. मात्र करोनाबाधितांच्या मृत्यू संख्येतील भर सुरूच आहे. आज दिवसभरात राज्यात ४८ हजार २११ रूग्ण करोनातून बरे झाले तर, २६ हजार २११ नवीन करोनाबाधित आढळून आले. याशिवाय ५१६ रूग्णांच्या मृत्यूची देखील नोंद झाली आहे.

आजपर्यंत राज्यात ४८,७४,५८२ रूग्ण करोनातून बरे होऊन घरी परतले आहे. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) आता ९०.१९ टक्के झाले आहे. याचबरोबर आजपर्यंत राज्यात ८२ हजार ४८६ रूग्णांचा मृत्यू झाला असून, राज्याचा मृत्यू दर आता १.५३ टक्के आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रयोगशाळेत तपासण्यात आलेल्या ३,१३,३८,४०७ नमुन्यांपैकी ५४,०५,०६८ नमुने (१७.२५) टक्के नमुने पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. सध्या राज्यात ३३,७४,२५८ रूग्ण गृहविलगीकरणात आहेत, तर, २८ हजार १०२ रूग्ण संस्थात्मक विलगीकरणात आहेत. याशिवाय, राज्यात ४,४५,४९५ अॅक्टिव्ह केसेस आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2021 10:26 pm

Web Title: maharashtra reports 26616 new covid19 cases 48211 recoveries and 516 deaths in the last 24 hours msr 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 रायगड जिल्ह्याला तौते वादळाचा तडाखा ; चौघांचा मृत्यू ,५ हजार घरांची पडझड!
2 वर्ध्यात लॉकडाउनमुळे शेतकरी आणि बारा बलुतेदार अडचणीत; सवलत देण्याची भाजपाची मागणी
3 Tauktae cyclone : सातारा जिल्ह्याला फटका; २२.५३ मिमी पावसाची नोंद!
Just Now!
X