राज्यात आज पुन्हा दिवसभरातील करोनाबाधितांची संख्या ही करोनामुक्त झालेल्यांपेक्षा अधिक आढळून आली. मागील २४ तासांमध्ये राज्यभरात २ हजार ६७३ नवे करोनाबाधित आढळले असून, १ हजार ६२२ जण करोनातून बरे झाले आहेत. याशिवाय ३० रुग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता २० लाख ४४ हजार ७१ वर पोहचली आहे. १९ लाख ५५ हजार ५४८ जण करोनातून बरे झाले आहेत. राज्यात ३५ हजार ९४८ अॅक्टिव्ह केसेस असून, ५१ हजार ३१० रुग्णांचा आतार्यंत मृत्यू झालेला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिलं आहे.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९५. ६७ टक्के आहे. कोरनाच्या पार्श्वभूमीवर आजपर्यंत राज्यभरात तपासणी करण्यात आलेल्या १,४९,७७,६८३ नमुन्यांपैकी २० लाख ४४ हजार ७१ नमूने (१३.६५ टक्के) पॉझिटिव्ह आढळले आहेत. सध्या राज्यात १ लाख ७२ हजार ३११ जण गृह विलगीकरणात असून, १हजार ९७९ जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत.