News Flash

चिंताजनक : राज्यात दिवसभरात ४९ हजार ४४७ करोनाबाधित वाढले, २७७ रूग्णांचा मृत्यू

राज्यात आज रोजी एकूण ४,०१,१७२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

राज्यात करोना संसर्गाचा आता उद्रेक पाहायला मिळत आहे. दररोज मोठ्यासंख्येने करोनाबाधित आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी भर पडताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्यात पुन्हा एकदा लॉकडाउन सुरू करावा लागण्याची चिन्हं दिसत आहेत. प्रशासनाकडून निर्बंध अधिक कडक करण्यात येऊन देखील, रूग्ण संख्येतील वाढ सुरूच आहे. आज दिवसभरात राज्यात ४९ हजार ४४७ करोनाबाधित वाढले असून, २७७ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर १.८८ टक्के आहे. राज्यात आजपर्यंत ५५ हजार ६५५ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. तसेच, राज्यात आज रोजी एकूण ४,०१,१७२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

दरम्यान आज दिवसभरात ३७ हजार ८२१ रुग्ण करोनातून बरे देखील झाले आहेत. तसेच, राज्यात आजपर्यंत एकूण २४,९५,३१५ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ८४.४९ टक्के एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,०३,४३,१२३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २९,५३,५२३ (१४.५२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २१,५७,१३५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १८,९९४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2021 8:17 pm

Web Title: maharashtra reports 49447 new covid cases and 277 deaths in the last 24 hours msr 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 मोठी घोषणा! पहिली ते आठवी परीक्षा रद्द; विद्यार्थ्यांना थेट पुढील वर्गात प्रवेश
2 लॉकडाउनला अजून वेळ आहे की, तो पर्यायच नाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे? – भाजपा
3 फडणवीसांच्या मदतीला धावले आशिष शेलार; जितेंद्र आव्हाडांना दिलं प्रत्युत्तर
Just Now!
X