26 January 2021

News Flash

नीलेश राणे म्हणतात; शिवसैनिक चांगलेच, पण…

'काही लुख्खे सांगत होते आम्ही निलेश राणेला रायगडात येऊ देणार नाही त्याच रायगडात जाऊन माणगाव तालुक्यात जाऊन

संग्रहित छायाचित्र

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि नारायण राणे यांचे पुत्र नीलेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. शिवसैनिक वाईट नाहीत पण जे अंगावर येतील त्यांना फेकून टाका, असे त्यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून म्हटले आहे.

रायगडमधील माणगावमध्ये रविवारी नीलेश राणे यांनी पक्षाचा कार्यक्रम घेतला. शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केल्याने नीलेश राणे आणि शिवसेनेत जुंपली आहे. याचा समाचार सोमवारी नीलेश राणे यांनी ट्विटमध्ये घेतला. ‘काही लुख्खे सांगत होते आम्ही निलेश राणेला रायगडात येऊ देणार नाही त्याच रायगडात जाऊन माणगाव तालुक्यामध्ये काल महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष प्रवेश कार्यक्रम घेतला. काल रायगडात ही सांगितलं सगळे शिवसैनिक वाईट नाहीत पण जे अंगावर येतील त्यांना फेकून टाका’, असे ट्विट त्यांनी केले.

नीलेश राणे यांनी माणगावमधील मेळाव्यात खासदार अनंत गीते हे निष्क्रीय खासदार असल्याची टीका केली. यापूर्वीही नीलेश राणे यांनी शिवसेनेवर टीका केली होती. त्यांनी उद्धव ठाकरे आणि प्रशांत किशोर यांचा फोटो ट्विट करत ‘… आणि ते राजीनामे पण फाडून टाकायला सांगा, सत्तेसाठी अर्ध कमळ छातीवर लावून फिरतील सुद्धा’, असे म्हटले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 12, 2019 4:47 pm

Web Title: maharashtra swabhiman party leader nilesh rane jibe at shiv sena
Next Stories
1 मासे देण्यास नकार दिल्याने बेदम मारहाण, मच्छीमाराचा मृत्यू
2 …म्हणून ‘राजा’नं द्यावी साथ, अजित पवारांची ‘मनसे’ साद
3 दुष्काळग्रस्तांसाठी आकस्मिकता निधीत दोन हजार कोटी रुपयांची वाढ
Just Now!
X