News Flash

‘मोदींची देशाला हिंदुराष्ट्र बनविण्याकडे वाटचाल’

गुजरातेत मुस्लिमांची कत्तल घडविणाऱ्यास देशाच्या पंतप्रधानपदी बसविण्यात आले, असा हल्ला चढवितानाच मोदींची वाटचाल िहदुराष्ट्र बनविण्याकडे सुरू झाली आहे. मुस्लिमविरोधी मोदींसह काँग्रेसही मुस्लिमांसाठी घातक आहे.

| October 9, 2014 01:20 am

गुजरातेत मुस्लिमांची कत्तल घडविणाऱ्यास देशाच्या पंतप्रधानपदी बसविण्यात आले, असा हल्ला चढवितानाच मोदींची वाटचाल िहदुराष्ट्र बनविण्याकडे सुरू झाली आहे. मुस्लिमविरोधी मोदींसह काँग्रेसही मुस्लिमांसाठी घातक आहे. आतापर्यंत गरीब मुस्लिम समाजाचा काँग्रेस-राष्ट्रवादीने मतदानापुरता वापर करुन घेतला. जातीय दंगली करुन मुस्लिमांना उद्ध्वस्त करण्यात आले. केवळ स्वार्थासाठी मुस्लिम समाजाला जवळ करणाऱ्या काँगेस-राष्ट्रवादीपासून दूर राहावे, असे आवाहन ‘एमआयएम’चे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी केले.
परभणीचे उमेदवार सज्जूलाला यांच्या प्रचारार्थ ओवेसी यांची दर्गा रस्त्यावरील कव्वाली मदानावर मंगळवारी रात्री सभा झाली. ओवेसी म्हणाले की, देशभरात मुस्लिमांवर अन्याय होत आहे. एकीकडे जातीयवादी पक्ष आणि दुसरीकडे वापर करून घेणारा काँग्रेस पक्ष अशा पेचात हा समाज अडकला आहे. गुजरातेत मुस्लिमांच्या कत्तली घडवणारे आज देशाचा कारभार चालवत आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून ते आतापर्यंत मोदींनी केवळ मुस्लिमांना शत्रू मानले. उत्तर प्रदेशातील वाराणसी, अयोध्या येथील मशिदी उद्ध्वस्त करुन मंदिरे उभारण्याचा घाट घातला जात आहे. एक बाबरी उद्ध्वस्त केली म्हणून काय झाले, आपण एक लाख मशिदी बांधून त्यांना बाबरी हे नाव द्यावे, असे आवाहन ओवेसी यांनी या वेळी केले.
स्वातंत्र्यापासून मतदानापुरता मुस्लिमांचा वापर करण्यात आला, असा आरोप करून ओवेसी म्हणाले की, लव्ह जिहादच्या नावाखाली मुस्लिम तरुणांना लक्ष्य केले जात आहे. एमआयएमच्या सभांवर र्निबध लादले जात आहेत. मोदी सरकार मुस्लिम हिताचे कायदे रद्द करण्याचा विचार करीत आहे. यातून मोदींना देशात मुस्लिम नको आहेत हेच निष्पन्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. ओवेसी यांच्या सभास्थळी पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला होता. सभेला मुस्लिम नागरिकांची मोठी उपस्थिती होती.
ही शेवटची निवडणूक – सज्जूलाला
आपली ही शेवटची निवडणूक असून यापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याचे उमेदवार सज्जूलाला यांनी जाहीर केले. मतदारांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता एमआयएमला मतदान करावे, असे आवाहन त्यांनी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 9, 2014 1:20 am

Web Title: make hindu country by narendra modi
Next Stories
1 मराठी तरूणाने विकसित केले मतदान केंद्र शोधण्याचे अॅप!
2 बोध कथा आणि विसरलेला पुष्पहार!
3 चंद्रपूर जिल्ह्य़ात राष्ट्रवादीसाठी गटबाजी विसरून परिश्रमाची गरज
Just Now!
X