News Flash

नागपूर: चारित्र्याच्या संशयावरुन प्रियकराने केली १९ वर्षीय तरुणीची हत्या

गाडीने तिला निर्जनस्थळी घेऊन गेला अन् तिची हत्या केली

खुशी परिहार (फोटो सौजन्य: Facebook/Khushi Parihar))

चारित्र्याच्या संशयावरुन नागपूरमध्ये एका तरुणाने आपल्या प्रेयसीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खुशी परिहार असे १९ वर्षीय मृत तरुणीचे नाव असून तिची हत्या करणारा तिचा प्रियकर अशरफ शेख याचा पोलिसांनी अटक केली आहे. आपली प्रेयसी इतर मुलांशी बोलते म्हणून त्यामुळेच चारित्र्याच्या संशयावरुन आपणच तिची हत्या केल्याची कबूली शेख याने पोलिसांकडे दिली आहे.

नागपूर पोलीस खात्यातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी सकाळच्या सुमारास पोलिसांना एका तरुणीचा मृतदेह अढळल्याचा फोन आला. पांढुर्णा- नागपूर महामार्गाजवळ चेहरा छिन्नविछिन्न झालेल्या अवस्थेत एका तरुणीचा मृतदेह अढळल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी सोशल मिडियाच्या मदतीने या मृतदेहाची ओळख पटवली तेव्हा नागपूरमधीलच खुशी परिहारचा मृतदेह असल्याचे समजले. खुशी स्थानिक पातळीवर होणाऱ्या अनेक फॅशन शोमध्ये सहभागी होत असे. खुशीला मॉडलींग क्षेत्रात करियर करायची इच्छा होती. सोशल मिडियावरुन मिळालेल्या माहितीच्या आधारांवर पोलिसांनी तपास सुरु केला अन् अखेर ते खुशीची हत्या करणाऱ्या तिच्या प्रियकरापर्यंत पोहचले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शेख याने आपला गुन्हा कबुल केला आहे. खुशी काही तरुण मुलांच्या संपर्कात असल्याने तिच्या चारित्र्यावर आपल्याला संशय होता. त्यातूनच आपण तिची हत्या केल्याची कबुली शेख याने पोलिसांकडे दिली आहे.

प्राथमिक माहितीनुसार १२ जुलै रोजी खुशी आणि शेख त्याच्या गाडीतून फिरायला गेले होते. त्याचवेळी त्याने पांढुर्णा- नागपूर महामार्गाजवळ शिवळी फाटा येथे एका निर्जनस्थळी गाडी थांबवून खुशीची निघृण हत्या केली. या प्रकरणात शेख विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून नागपूर पोलीस पुढील तपास करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2019 10:04 am

Web Title: man crushes 19 yr old girlfriend face on suspicion of her character cops scsg 91
Next Stories
1 महाराष्ट्र काँग्रेसला प्रदेशाध्यक्ष मिळाला पण नेतृत्वासाठी पक्ष उरलाय?-शिवसेना
2 मृत मासे खाल्ल्याने मगरीचा मृत्यू
3 कोकण वगळता राज्यात पावसाची उघडीप
Just Now!
X