News Flash

अवकाळी पावसाचा दणका; आंब्याची चव यंदाही महाग

सलग तिसऱ्या वर्षी जिल्ह्यास अवकाळी पाऊस आणि गारांचा तडाखा बसला.

सलग तिसऱ्या वर्षी जिल्ह्यास अवकाळी पाऊस आणि गारांचा तडाखा बसला. ऐन मोहरात आलेल्या आंब्याला अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने घेरल्यामुळे फुलारून आलेली आंब्याची झाडे झडून गेली, तर द्राक्षबागेत जमिनीवर द्राक्षाच्या मण्यांचा सडा पडला. अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे उस्मानाबाद, तुळजापूर, कळंब, परंडा, लोहारा व उमरगा तालुक्यात द्राक्ष व गावरान आंबा उत्पादनात सुमारे ५० टक्क्यांहून अधिक घट होणार असल्याचे यामुळे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे यंदाही जिल्ह्यातील आंबा आणि द्राक्ष उत्पादकांना आíथक संकटाचा सामना करावा लागणार आहे.
मागील आठवडय़ात अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात जवळपास सर्वच ठिकाणच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. रानावर काढून टाकलेली ज्वारी, करडई भिजल्याने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. या बरोबरच कडबाही भिजून बेचव झाला. पावसामुळे ज्वारीची नसíगक चकाकी नाहीशी झाली. आंब्याचा मोहर गळाल्याने उत्पादनात ५० टक्क्यांहून अधिक प्रमाणात घट होणार आहे.
उस्मानाबाद तालुक्यातील झरेगाव, कौडगाव, खानापूर, आंबेजवळगा, तुळजापूर तालुक्यातील मुर्टा, नळदुर्ग, सिंदफळ, सावरगाव, माळुंब्रा, काकंबा, उमरगा तालुक्यातील कदेर, मुरुम, सुंदरवाडी, दािळब, लोहारा तालुक्यातील कास्ती बु, लोहारा, माकणी, सास्तूर, कळंब तालुक्यातील मोहा, कोठाळवाडी, िपपळगाव, परंडा तालुक्यातील परंडय़ासह तालुक्यात काही ठिकाणी द्राक्षांचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात घेतले जाते. मात्र, या परिसरातील सर्वच बागांना नुकसानीचा फटका बसला. सलग चौथ्या वर्षी ढगाळ वातावरण, गारपिटीमुळे नुकसान सहन करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. दुसरीकडे दुष्काळामुळे प्रकल्पही कोरडेठाक पडले आहेत. पावसाअभावी सुकत असलेल्या फळबागांना यामुळे जीवदान मिळेल, असा अंदाज कृषितज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. मात्र, फळ अवस्थेत असलेल्या द्राक्ष, आंब्याचे मात्र नुकसान झाले आहे.

कर्जातून मुक्ती मिळणे अवघड
माझ्याकडे एक हेक्टर ८० आर शेतजमीन आहे. पकी ८० आर क्षेत्रावर द्राक्षबाग उभारली. एका मुलीच्या लग्नात ६ लाख रुपये कर्ज झाले. यंदा तरी द्राक्षबागेतून चांगले उत्पन्न मिळण्याची आशा होती. मात्र, पाण्याअभावी ही द्राक्ष बाग सुकत आहे. त्यातच अवकाळीचा फटका बसल्यामुळे फळ अवस्थेत असलेल्या बागेचे मोठे नुकसान झाले. बँकेचे कर्ज, बागेवर फवारणीसाठी घेतलेली उधार औषधे, घर प्रपंच, मुलाचे शिक्षण व इतर खर्च करणे अवघड झाले आहे. लखपतीचे स्वप्न पाहिले. मात्र, निसर्गाने आम्हाला कंगाल केले. पसाच नसल्याने कर्जातून आम्हाला मुक्ती मिळणे अवघड असल्याची खंत झरेगाव येथील शेतकरी चंद्रकांत सारफाळे यांनी व्यक्त केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2016 1:27 am

Web Title: mango rates increase because untimely rains
टॅग : Mango
Next Stories
1 ‘घरातील महिलांच्या कर्तृत्वाला संधी द्या’
2 जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांच्या बदलीला पालकमंत्र्यांचा नकार
3 डंपर आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर सिंधुदुर्गात मनाई आदेश
Just Now!
X