शहरातील पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर मुलीचा ताबा मिळावा आणि पतीला अटक व्हावी, या मागणीसाठी विवाहिता चक्क झाडावर चढून बसली. रुमालाच्या सहाय्याने गळफास घेण्याची धमकीही दिली.  मुख्य रस्त्यावरच हा प्रकार घडल्याने बघ्यांची गर्दी झाली. जिल्हा पेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक अकबर पटेल आणि त्यांचे सहकारी यांनी काही तरुणांच्या मदतीने महिलेला खाली उतरविले. विरवाडे (ता.चोपडा) येथील पंकज पाटील याच्याशी गाढोदा (ता. जळगाव) येथील अश्विनी हिचा विवाह एक फेब्रुवारी २०१७ रोजी झाला.

दरम्यान पंकजला पुणे येथे नोकरी लागली. त्यामुळे ते पुण्याला गेले. तेथे दोन फेब्रुवारी रोजी एक वर्षांच्या चिमुरडीला ठेवून घेत सासरच्यांनी अश्विनीचा अस्वीकार केला. त्यानंतर तिला जळगावी सासरी आणण्यात आले होते. दरम्यान १८ मे २०२० रोजी अश्विनीने आत्महत्येचा प्रयत्न केला होता.  त्यावरून तालुका पोलीस ठाण्यात पती पंकज पाटील, सासू रेखा पाटील, सासरे अशोक पाटील आणि जेठ प्रदीप पाटील यांच्याविरुद्ध गुन्हाही दाखल आहे. गुरुवारी सासर आणि माहेरकडील मंडळी न्यायालयात आली होती.  फारकत द्या मग मुलीला देणार, अशी सासरकडील मंडळींनी मागणी केली. त्यानंतर वडील आणि आईसह अश्विनी पोलीस अधीक्षक कार्यालयात आले.  तेथे वरिष्ठ पोलीस अधीक्षकांकडे दाखल गुन्ह्यातील पती आणि इतरांना अटक करा, म्हणून मागणी केली. त्यावेळी अश्विनी मुलीचा ताबा न मिळाल्यामुळे चक्क पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर असलेल्या मुख्य रस्त्यावरील झाडावर चढून बसली. तब्बल ४५ मिनिटे ती झाडावर होती. काही वेळाने जिल्हा पेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक अकबर पटेल हे सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी काही तरुण आणि वाहतूक पोलिसाच्या मदतीने अश्विनीला खाली उतरविले.  तेथून थेट पोलीस ठाण्यात आणून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

 रोह्यतील विलगीकरण सेंटर मध्ये तरुणीचा विनयभंग

अलिबाग- तांबडी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्येचे प्रकरण ताजे असतांनाच, मंगळवारी रोह्यतील खासगी कंपनीत उभारण्यात आलेल्या विलगीकरण सेंटर मध्ये एका तरुणीचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरु आहे.