लोकसभा निवडणुकीत सातारा येथून उदयनराजे भोसले यांच्या विरोधात निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी शुक्रवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीचा राजकीय अर्थ काढू नका, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. नरेंद्र पाटील यांच्याबाबत आगामी दोन दिवसात देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे दोघे चर्चा करुन निर्णय घेतील, असे सूत्रांनी सांगितले.

साताऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या विरोधात माथाडी नेते नरेंद्र पाटील हे निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. त्यांना भाजपाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती. या चर्चा सुरु असतानाच नरेंद्र पाटील यांनी शुक्रवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली. या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, या भेटीचा राजकीय अर्थ काढू नये. दोन दिवसांमध्ये युतीच्या प्रचाराचा नारळ कोल्हापूरमधून फोडणार आहोत. राज्यातील ४८ जागांवर युतीचेच उमेदवार विजय होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

Patanjali Expresses Regret
एका आठवड्यात जनतेची जाहीर माफी मागा; सर्वोच्च न्यायालयाचा बाबा रामदेव व आचार्य बाळकृष्ण यांना आदेश
kanhaiya kumar latest marathi news
“आश्वासनांचे अपयश लपविण्यासाठीच पंतप्रधान मोदींकडून ४०० पारचा नारा”, काँग्रेस नेते कन्हैयाकुमार यांची टीका
narayan rane On uddhav thackeray
“आम्ही मातोश्रीवर भेट द्यायचो तेव्हा प्रसाद घेऊन जावा लागायचा, मग तो काळा पैसा नव्हता का?”; नारायण राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
loksatta readers opinion on editorial readers reaction on loksatta news
लोकमानस : त्रासाची जबाबदारी स्वीकारली नाही

नरेंद्र पाटील यांच्या बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे चर्चा करुन दोन दिवसांमध्ये निर्णय घेतील, असे सांगितले जाते.

नरेंद्र पाटील शिवसेनेत जाणार ?

सातारा येथून उमेदवारी मिळावी यासाठी नरेंद्र पाटील हे भाजपाच्या संपर्कात होते. मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी यासाठी प्रयत्न देखील केले होते. यात भर म्हणजे नरेंद्र पाटील यांनी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेतली होती. दोघांनी एकत्र मिसळ खाल्ल्याने तर्कवितर्कांना उधाण आले होते. उदयराजेेंविरोधात नरेंद्र पाटील यांनी मोर्चेबांधणीचा प्रयत्न देखील केला. त्यामुळे भाजपाकडून नरेंद्र पाटील यांना संधी दिली जाण्याची शक्यता होती. मात्र, भाजपा- शिवसेना युती झाली असून साताऱ्याची जागा सोडण्यास शिवसेनेने नकार दिला होता. त्यामुळे नरेंद्र पाटील यांनी आता शिवसेनेत प्रवेश करुन शिवसेनेतर्फे उमेदवारी जाणार, अशी चर्चा रंगली आहे. मात्र, याबाबत नरेंद्र पाटील आणि शिवसेनेच्या गोटातून अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.