पारनेर : पाच रुपयांचे आमिष दाखवून पाचवीत शिकणाऱ्या  ११ वर्षीय चिमुरडीवर तिच्याच घराजवळ राहणाऱ्या नातेवाईक नराधमाने तीनदा अत्याचार केल्याची संतापजनक घटना तालुक्यातील पाडळीदऱ्या येथे उघडकीस आली आहे.  पारनेर पोलिसांनी या नराधमास जेरबंद केले असून त्याच्या या कृत्यामुळे तालुक्यात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

पाचवीत शिकणारी पीडित चिमुकली गांधी जयंतीच्या दिवशी दुपारच्या सुमारास तिच्या इतर दोन लहान बहिणींसह शेजऱ्यांच्या घरापुढील नारळाच्या झाडाखाली खेळत होती.तेथेच राहणाऱ्या शिवाजी महादू गुंजाळ या नराधमाने तिघींनाही त्याच्या घरात बोलविले. काही वेळानंतर दोन्ही लहान बहिणींना पुन्हा नारळाच्या झाडाखाली खेळण्यासाठी पाठवून पीडित मुलीस घरातच ठेवले. तिच्याशी गोड बोलून तिच्यावर अत्याचार केला.  त्रास होऊन पीडिता रडू लागल्याने  शिवाजी याने तिला पाच रुपयाचे नाणे दिले व कोणास सांगितले तर जीवे मारण्याची धमकी दिली. पीडितेस दिलेले पाच रुपयांचे नाणे तिने तिच्या कंपास बॉक्स मध्ये ठेवले होते. ते लहान बहिणीने पहिल्यानंतर मलाही पाच रुपयांचे नाणे हवे, मोठ्या दीदीला गुंजाळ बाबाने पाच रुपयाचे नाणे दिले असल्याचे तिने आईस सांगितले. गुंजाळ बाबा कधीही कोणास पैसे देत नसताना पीडितेस कसे दिले याचा संशय आल्याने आईने तिच्याकडे कसून चौकशी केली असता तिने झालेला प्रकार आईपुढे कथन केला. यापूर्वीही सुटीच्या दिवशी नराधम शिवाजी याने  दोनदा अत्याचार केल्याचे पीडितेने तिच्या आईस सांगितले.

Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
couple confessed to murdering the girl as they could not take care of it
मुलीचा सांभाळ करता येत नसल्याने केली हत्या, दाम्पत्याची कबूली
clemen lobo arrested after 36 years in salim cassetwala murder case
वसईतील प्रसिध्द सलीम कॅसेटवाला हत्या प्रकरण; फरार आरोपी क्लेमेन लोबोला ३६ वर्षांनी अटक
Pune, Woman, Commits Suicide, Over Property Dispute, Case Registered, Brother, Relatives, police, crime news, marathi news,
पुणे : संपत्तीच्या वादातून महिलेची गळफास घेऊन आत्महत्या; सख्या भावासह नातेवाईकांविरुद्ध गुन्हा

पीडितेच्या आईने पारनेर पोलिस ठाण्यात येऊन नराधम शिवाजी महादू गुंजाळ याच्याविरोधात फिर्याद दाखल केली. शिवाजी याच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी शिवाजी गुंजाळ यास अटक केली.