चौथीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचे शुक्रवारी सायंकाळी अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. अत्याचार करणारा नराधम पीडित मुलीला सोडून फरार झाला आहे. पोलीस त्याच्या शोधात आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, सदर पीडित मुलगी ही चौथीत शिक्षण घेत आहे. ती शुक्रवारी (१३)  रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर घराकडे जात असताना संशियीत आरोपीने सदर मुलीला खोटी ओळख सांगून तिला दुचाकीवर  बसण्यास भाग पाडले. त्यानंतर आरोपीने पीडित मुलीला शहाजापूर  कोळगाव रोड शेजारी असलेल्या कालव्या लगतच्या निर्मनुष्य वस्तीत असलेल्या बंद खोलीचे कुलूप तोडून त्याठिकाणी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्याने तिला मारहाण करून गंभीर जखमी करीत जीवे मारण्याचा दम देत तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान मुलगी शाळा सुटल्यावर घरी न आल्याने तिच्या घरच्यांनी कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली. पोलीस व नातेवाईक यांनी शोधाशोध केली असता एका ठिकाणी सी. सी. टीव्ही फुटेजच्या माध्यमातून एका अज्ञात व्यक्तीने सदर मुलीस मोटार सायकलवर बसवून घेऊन गेल्याचे दिसून आले. त्यामुळे सदर मुलीचे अपहरण झाले आहे याची खात्री पोलिसांसह सर्वाना पटली.त्यानुसार पोलीस यंत्रणा सतर्क झाली. पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रभारी पोलीस अधीक्षक डॉ. सागर पाटील यांच्याशी संपर्क साधला. त्यानुसार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या तीन पथकांच्या तुकडय़ा कोपरगावच्या दिशेने अहमदनगर येथून रवाना करण्यात आल्या. तर कोपरगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक कटके यांच्या मार्गदर्शनाखाली चौथे पथक मुलीचा शोध घेण्यासाठी तालुका व परिसरात रवाना झाले. पोलीस अधिकाऱ्यांसह ३४ कर्मचाऱ्यांचा  ताफा आरोपीच्या मागावर होता. रात्रभर पोलीस व नातेवाईक यांनी शोध घेऊनही मुलगी सापडली नाही. आरोपीही सापडला नाही. मात्र पहाटेच्या दरम्यान शाळेचे मुख्याध्यापक, दोन गावाचे पोलीस पाटील यांना एक मोटार सायकल बेवारस अवस्थेत मिळून आली. त्यानंतर पुढील धक्कादायक घटना उघडकीस आली.

Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
chaturang article, mazhi maitrin chaturang
माझी मैत्रीण : जिवाभावाची…
in Relationships Your self-esteem is in your hands
नातेसंबंध : आपला आत्मसन्मान आपल्या हाती!
second wife of an invalid marriage may not complain of harassment but of dowry
अवैध लग्नाची दुसरी पत्नी छ्ळाची नाही, पण हुंड्याची तक्रार करू शकते

आरोपीचा शोध सुरू

पोलिसांनी अपहरण झालेली मुलगी व सापडलेली गाडी याची सखोल चौकशी केली असता मोटर सायकल (एम एच ४१ ३०३३) शहजापूर येथील गणेश गोपीनाथ शिंदे यांच्या मालकीची असल्याचे निष्पन्न झाले. सदर गाडी उसाचे वाढे आणण्यासाठी पाथर्डी येथील ऊस तोड कामगार अमोल बाबुराव निमसे हा घेऊन गेल्याचे उघड झाले. त्यावरून पोलिसांनी अधिक तपास केला असता त्याने पीडित मुलीला त्या गाडीवरून शहजापूर येथील शिवाजी बोरसे यांच्या मालकीच्या कोळगाव पाटा शेजारील खोलीत नेऊन अत्याचार केल्याचे उघड धाले.  मात्र तो फरार असल्याने पोलिसांनी गुप्तता बाळगली असून आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरु आहे. दरम्यान पोलिसांनी आरोपीविरोधात शुक्रवारी दाखल पोक्सो व अ‍ॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.