News Flash

येरवडा कारागृहात मोबाइल सापडला

नाशिक कारागृहात मोबाइल सापडल्याचे प्रकरण ताजे असताना पुण्यातील येरवडा कारागृहात शुक्रवारी दुपारी सर्कल

| September 15, 2013 02:35 am

नाशिक कारागृहात मोबाइल सापडल्याचे प्रकरण ताजे असताना पुण्यातील येरवडा कारागृहात शुक्रवारी दुपारी सर्कल तीनमध्ये फेकून दिलेला मोबाइल येथील कर्मचाऱ्यांना सापडला. ‘हा मोबाइल कोणी आणला, तो आत कसा आला याची कारागृह प्रसासनाने चौकशी सुरू केली आहे,’ अशी माहिती येरवडा कारागृहाचे पोलीस अधीक्षक योगेश देसाई यांनी दिली.
येरवडा कारागृहात संशयित दहशतवादी कतिल सिद्दीकीचा खून झाल्यानंतर येथील सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली होती. मात्र, कारागृहातील शिपायांना शुक्रवारी दुपारी सर्कल तीन मधून जाताना जमिनीवर एक मोबाइल आढळून आला. त्यांनी तत्काळ याची माहिती वरिष्ठांना कळवून मोबाइल कारागृह प्रशासनाकडे जमा केला. या मोबाइल चालू स्थितीतील असून, त्याच्यात सीमकार्डही सापडले आहे. कारागृहात जाताना कैद्यांची कसून चौकशी केली जाते. तरीही हा मोबाइल कोणी आणला, तो कारागृहात कसा आला याचा तपास सुरू केला आहे.
काही दिवसांपूर्वीच येरवडा कारागृहाच्या प्रवेशद्वाराजवळ तपासणीत गांजा मिळाला होता. आता थेट कारागृहात मोबाइल आढळून आल्यामुळे येथील सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वीच कारागृहामध्ये मोबाइल जॅमर बसविण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले आहेत. मात्र, त्याची अद्यापही अंमलबजावणी झालेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2013 2:35 am

Web Title: mobile found in yerwada central jail
Next Stories
1 लघुपटाद्वारे घडले भुयाराचे अनोखे दर्शन
2 नाशिकमध्ये पुन्हा ‘एटीएम’वर डल्ला खास
3 महाड ग्रामीण रुग्णालयात वयाच्या दाखल्यासाठी १०० रु.
Just Now!
X