मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या

1. मुंबईत पश्चिम रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत, प्रवाशांचे हाल

पश्चिम रेल्वेवर गोरेगाव स्थानकाजवळ बुधवारी सकाळी सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने लोकल गाड्यांची वाहतूक विस्कळीत झाली. वाचा सविस्तर..

2.इस्रोकडून ‘रीसॅट-२बी’ उपग्रहाचे प्रक्षेपण; ‘पीएसएलव्हीसी ४६’ मोहिम यशस्वी

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)ने बुधवारी पहाटे ५ वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून ‘पीएसएलव्हीसी ४६’ चे यशस्वी प्रक्षेपण केले. वाचा सविस्तर..

3.मोदींच्या नेतृत्वावर विश्वास

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पुन्हा केंद्रात भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचेच (एनडीए) सरकार स्थापन होण्याची खात्री बाळगत मंगळवारी तब्बल ३६ घटक पक्षांच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर एकमुखी विश्वास व्यक्त केला. वाचा सविस्तर..

4.मुंबईतील मराठी विद्यार्थ्यांचा ‘माय’ सोडून ‘मावशी’कडे ओढा!

मराठी विद्यार्थीही अकरावीला प्रवेश घेताना द्वितीय भाषा म्हणून हिंदीला प्राधान्य देत असल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे. वाचा सविस्तर..

5.दुष्काळ निवारण कामांसाठी आमदार निधी वापरता येणार

दुष्काळ निवारणाच्या विविध कामांसाठी आमदार निधी वापरण्याची मुभा देण्याचा निर्णय भाजप आमदारांच्या आग्रहानंतर राज्य सरकारने घेतला आहे. वाचा सविस्तर..