News Flash

मुंबई- पुणे एक्स्प्रेस वे आज दोन तासांसाठी बंद

मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे टोलनाक्यापासून काही अंतरावर ओव्हरहेड गॅन्ट्रीज टाकण्यात येणार आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई- पुणे एक्स्प्रेस वे आज (शुक्रवारी) देखभाल- दुरुस्तीच्या कामासाठी दोन तास बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबईहून पुण्याकडे येणारी मार्गिका दुपारी १२ ते २ या वेळेत बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे दुपारी १२ ते २ या वेळेत महामार्गावरील वाहतूक शेडुंग फाटा येथून पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर वळवण्यात येणार आहे.

मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे टोलनाक्यापासून काही अंतरावर ओव्हरहेड गॅन्ट्रीज टाकण्यात येणार आहे. शुक्रवारी खालापूर टोल नाक्यापासून काही अंतरावर गॅन्ट्रीज टाकण्यात येणार आहे. या कामासाठी मुंबईहून पुण्याकडे येणारा मार्ग दुपारी १२ ते २ या वेळेत बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत पर्यायी मार्गाची आखणी करण्यात आली असून, वाहनधारकांनी त्याचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.

काय आहे पर्यायी मार्ग ?

वाहनधारकांना शेडुंग फाटा, अजिवली चौक, दांड फाटा, चौक (कर्जत) फाटा, खालापूर फाटा (सावरोली फाटा) येथून खासापूरमार्गे परत खालापूर टोल नाका येथून पुण्याकडे जाता येईल. तसेच अवजड मालवाहू वाहनांना एक्स्प्रेस वेवरील चिखले पूल येथे थांबवण्यात येईल, असे  अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) विजय पाटील यांनी सांगितले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2019 7:40 am

Web Title: mumbai pune expressway closed for two hours on friday work on installing overhead gantry
Next Stories
1 पुण्यात संगणक अभियंत्याचा संशयास्पद मृत्यू
2 पाणीकपातीबाबतच्या निर्णयासाठी महापालिकेला एक आठवडय़ाची मुदत
3 पालिकेचा करवाढीवर भर
Just Now!
X