News Flash

विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनासाठी गुरांचे खाद्य? पुण्यातील महानगरपालिकेच्या शाळेत घडला हा अजब प्रकार

पुण्यातील शाळा क्रमांक ५८ येथून ही बाब उघडकीस आली आहे

छायाचित्र सौजन्य: एएनआय

भारतातील मध्यान्ह भोजनात वादाचा वाटा चांगलाच आहे. आता पुण्यातील महानगरपालिकेच्या शाळेतून ही घटना उघडकीस आली असून तेथे विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनाचा भाग म्हणून जनावरांचे खाद्यपाठविण्यात आले.

महाराष्ट्रातील पुण्यात शाळा क्रमांक ५८ येथून ही भयावह बाब उघडकीस आली आहे. सदर शाळा ही पुणे महानगरपालिका चालवते. भारतातील सर्वात श्रीमंत नागरी संस्थांपैकी एक असलेल्या महानगरपालिका या वर्षी १५ जानेवारीपर्यंत ३,२८५ कोटी रुपयांचा महसूल जमा केला आहे.

देशव्यापी लॉकडाऊनमुळे सर्व शैक्षणिक संस्था बंद पडल्यामुळे महाराष्ट्रातील राज्य शासकीय शाळांतील विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनाचे वाटप करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य शासकीय शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरी मध्यान्ह भोजन पोहोचेल यासाठी स्थानिक अधिकारी कार्यरत करण्यात आले आहेत.

या आठवड्याच्या सुरुवातीस महानगरपालिका संचलित शालेय क्रमांक ५८ ला मध्यान्ह भोजन म्हणून वितरित करण्यात येणाऱ्या खाद्य सामग्रीचा एक साठा मिळाला. शालेय अधिकाऱ्यांना लवकरच समजले की त्यांना मध्यान्ह भोजनाच्या नावाखाली गुराढोरांचा खाद्याचा पुरवठा केला गेला आहे.

स्थानिक कार्यकर्त्यांनी या विषयावर प्रकाश टाकला, परिणामी भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (एफएसएसएएआय) च्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेतली. एफएसएसएएआयने आता पुणे शाळेत पाठवलेला हा माल जप्त केला आहे.

पुणे महापौर मुरलीधर मोहोळ यांना याबद्दल विचारले असता ते म्हणाले की, शाळा महाराष्ट्र सरकारच्या मध्यान्ह भोजन योजनेचा भाग आहे. केवळ विद्यार्थ्यांमध्ये आलेले अन्न वाटप करण्याची जबाबदारी पुणे महानगरपालिका आहे.
महापौर पुढे म्हणाले, “विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह भोजन म्हणून जनावरांचे भोजन पाठविणे फार दुर्दैवी आहे. आमची मागणी आहे की या प्रकरणाची सखोल चौकशी झालीच पाहिजे आणि त्यासाठी जबाबदार असणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2021 7:22 pm

Web Title: municipal school in pune sent animal fodder to be served to students under mid day meal sbi 84
Next Stories
1 ‘मी भोसरीचा दादा आहे, माझं नाव..’, म्हणत धमाकावणाऱ्याला पोलिसांकडून; लाखो रुपयांचं सोनं जप्त
2 “४० वर्ष सेवा करतोय हे आमच्या कुटुंबाचं चुकलं का?,” पुण्यात भाजपा नगरसेवकाचे होर्डिंग ठरतोय चर्चेचा विषय
3 सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांना भारतरत्न देण्याचा ठराव पुणे महानगरपालिकेकडून मंजूर