मुस्लिमांचे एकच मिशन ‘आरक्षण, शिक्षण आणि संरक्षण’ अशी हाक देत बीडमध्ये मंगळवारी मोर्चा काढण्यात आला. क्रीडा संकुलात जमा झालेल्या मोच्रेकऱ्यांनी राष्ट्रगीताने जिल्हाधिकारी कचेरीकडे कूच केली. स्वयंसेवकांचे कडे, मोच्रेकऱ्यांच्या स्वयंशिस्तीत चार

किलोमीटरचा रस्ता गर्दीने व्यापून गेला. बाबरीपासून दादरीपर्यंत अन्याय आणि जेएनयुमधील ‘मुजीब कहाँ है?’, ‘शरीयतमध्ये हस्तक्षेप नको’ या फलकावरील घोषवाक्यांनी मूकमोर्चातून समाजातील अस्वस्थतेचे उग्र रूप समोर आले. तिरंगा झेंडा हातात घेतलेल्या मोच्रेकऱ्यांनी शांततेत नगर रस्त्यावर ‘दुआ’ करून समारोप केला. गर्दीचे उच्चांक मोडीत काढणाऱ्या या मूकमोर्चाने मुस्लीम समाजाच्या एकीचे जोरदार शक्ती प्रदर्शन झाले. इतर मोर्चाप्रमाणेच कोणत्याही संघटना व नेत्याशिवाय निघालेल्या या मोर्चाने आणखी एक विक्रम नोंदवला असून सरकार काय निर्णय घेते, याकडे लक्ष आहे.  शहरात मंगळवारी सकाळी दहापासूनच गावागावांतून मोठय़ा संख्येने दाखल झालेले मुस्लीम तरुणांचे जथ्थे जिल्हा क्रीडा संकुलाच्या मदानात जमा झाले. दोन-अडीच तासांत क्रीडा संकुल मदानात पाय ठेवायला जागा राहिली नाही. डोक्यावर भगव्या, पांढऱ्या आणि हिरव्या रंगाचे फेटे, हातात भारताचा तिरंगा ध्वज आणि समाजाच्या मागण्यांचे फलक घेतलेल्या मोच्रेकऱ्यांनी राष्ट्रगीत म्हणून मोर्चाला सुरुवात केली. स्वयंसेवकांची रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी तटबंदी तर जागोजागी वेगवेगळ्या सामाजिक संघटनांनी मोच्रेकऱ्यांसाठी पाणी आणि खाण्याच्या पाकिटांची व्यवस्था केली होती. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सुभाष रोड, माळीवेस, धोंडीपुरा, बलभीम चौक, कारंजा, राजुरी वेस, बशीरगंज, शिवाजी चौक माग्रे नगर रस्त्यावरील जिल्हाधिकारी कचेरीवर मोर्चा धडकला. मोच्रेकरी जिल्हाधिकारी कचेरीवर पोचले तेव्हा जिल्हा क्रीडा संकुलातूनही मोच्रेकरी निघत असल्याने तब्बल चार किलोमीटरचा मार्ग गर्दीने भरला होता. अपर जिल्हाधिकारी यांनी मोच्रेकऱ्यांचे निवेदन स्वीकारल्यानंतर दुआ मागितल्यानंतर आमीन म्हणत मोर्चाचा समारोप झाला.

अशा होत्या घोषणा

  • जेएनयुतील मुजीब कहाँ है?

’मुस्लीम समाज नथुराम गोडसेंचा नव्हे तर टिपू सुलतानचा वारसदार आहे. ’आरक्षणाशिवाय समाजाचा विकास होणार नाही.

  • अशा आहेत मागण्या

’राज्य सरकारने दिलेले शिक्षण, नोकरीतील आरक्षणाचे कायद्यात रुपांतर करा.  ’आरक्षणाबाबतचा १९५० चा अध्यादेश मागे घ्या. मराठा, मुस्लीम, धनगर सहित सर्व मागास घटकांना आरक्षण द्या. ’मुस्लिमांनाही अ‍ॅट्रॉसिटी कायदा लागू करा. ’शरियतमधील हस्तक्षेप चालणार नाही