01 March 2021

News Flash

“सत्तापक्ष का नेता ना हुआ तो क्या हुआ …” म्हणत नाना पटोलेंनी फडणवीसांना दिलं प्रत्युत्तर

...तर भाजपा नेत्यांना एवढ्या मिरच्या झोंबण्याचे कारण काय? असा सवाल देखील केला आहे.

संग्रहीत छायाचित्र

“सत्तापक्ष का नेता ना हुआ तो क्या हुआ विपक्ष का नेता तो हुआ, याच नकारात्मक भूमिकेतुन माझे मित्र देवेंद्र फडणवीस अलिकडे वक्तव्य करीत असतात. त्यामुळे त्यांचे वक्तव्य फारसे मनावर घेण्याचे कारण नाही. पेट्रोल आणि गॅस दरवाढी संदर्भात मी जनतेच्या मनातील असंतोषाला वाचा फोडली आहे. ” असे प्रत्युत्तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला दिले आहे.

इंधन दरवाढीवरून अमिताभ बच्चन व अक्षयकुमार यांच्यावर पटोले यांनी निशाणा साधल्यानंतर त्यावर फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली होती, त्यानंतर आता नाना पटोले यांनी फडणवीसांच्या टीकेला उत्तर दिले आहे.

तसेच यावेळी, “एरवी छोट्या-छोट्या गोष्टींवर टीव-टीव करणारे अभिनेते जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर गप्प का?… ही जनतेच्या मनातील भावना मी व्यक्त केली, तर भाजपा नेत्यांना एवढ्या मिरच्या झोंबण्याचे कारण काय?” असा प्रश्न देखील पटोलेंनी विचारला आहे.

“महाराष्ट्रात अक्षय कुमार आणि अमिताभ यांचे सिनेमे बंद पाडू”; नाना पटोलेंचा इशारा

दरम्यान, नाना पटोलेंनी अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या  सिनेमाचं शूटिंग बंद पाडण्याच्या दिलेल्या इशाऱ्याला देवेंद्र फडणवीसांनी पब्लिसिटी स्टंट म्हटलं आहे. ”नाना पटोलेंचा हा पब्लिसिटी स्टंट आहे. त्यांना माहितीये की अमिताभ बच्चन, अक्षय कुमार यांच्यावर काही बोललं, तर पब्लिसिटी मिळते. यात त्यांचंच भलं आहे. नवेनवे अध्यक्ष झाले आहेत. त्यांनाही त्यांचं नाव कमवायचं आहे. त्यामुळे त्यांना वाटतं की दिवसभर पब्लिसिटी मिळते. शूटिंग कसं आणि कोण बंद करू शकतं? इथे कायद्याचं राज्य आहे. तुम्ही सत्तारूढ पक्षाचे आहात याचा अर्थ असा नाही की तुम्ही मालक झालात’, असं फडणवीस म्हणाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 19, 2021 4:03 pm

Web Title: nana patole replied to fadnavis msr 87
Next Stories
1 वाई : आंबेनळी घाटात अज्ञात व्यक्‍तीचा मृतदेह सापडला
2 पूजा चव्हाण प्रकरणावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले…
3 पेट्रोलवर राज्याचा टॅक्स किती रुपये?; अजित पवार म्हणतात…
Just Now!
X