23 January 2018

News Flash

विजयाचे वर्तुळ पूर्ण!

शंकररावांनंतर नांदेडची सूत्रे अशोक चव्हाण यांच्याकडे आली.

लोकसत्ता टीम | Updated: October 13, 2017 2:04 AM

अशोक चव्हाण ( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

नांदेडमध्ये अशोक चव्हाण विरुद्ध सारे असे चित्र नेहमी बघायला मिळते. लोकसभा निवडणुकीपासून सुरू झालेली विजयाची परंपरा अशोकरावांनी महानगरपालिकेपर्यंत कायम राखली असून, विजयाचे वर्तुळ पूर्ण झाले आहे.

नांदेड हा माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचा बालेकिल्ला होता. शंकररावांनंतर नांदेडची सूत्रे अशोक चव्हाण यांच्याकडे आली. अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये आपले बस्तान बसविले. २६ नोव्हेंबरला मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्रिपद अशोकरावांकडे आले. आलेल्या संधीचा त्यांनी फायदा उठविला. मुख्यमंत्रिपदाच्या काळात नांदेडला जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून दिला. २००९च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी नांदेडला झालेल्या जाहीर सभेत पुन्हा सत्तेत आल्यावर अशोक चव्हाण यांचीच मुख्यमंत्रिपदी फेरनिवड करण्याचे संकेत काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिले आणि त्याचा फायदा झाला होता. जिल्ह्य़ात एकहाती यश काँग्रेसला मिळाले होते.

२००९च्या निवडणुकीनंतर पुन्हा मुख्यमंत्रिपद मिळाल्यावर अशोकरावांनी नांदेडला विभागीय आयुक्तालय स्थापन करण्याचा निर्णय घेऊन नांदेड जिल्ह्य़ावरील पकड अधिक घट्ट केली. विभागीय आयुक्तालय प्रत्यक्षात अस्तिवात आले नसले तरी अशोक चव्हाण यांनी लातूरऐवजी नांदेडला आयुक्तालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता, अशी भावना त्यांच्याबद्दल निर्माण झाली. ‘आदर्श’ घोटाळ्यानंतर अशोकरावांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. तरीही नांदेडमध्ये अशोकरावांच्या प्रतिमेवर परिणाम झाला नाही. २०१२च्या महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला सत्ता मिळाली. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांना उमेदवारी देण्यास तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विरोध दर्शविला होता. पण पक्ष नेतृत्वाने अशोकरावांना संधी दिली.

लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसचा धुव्वा उडाला असताना नांदेडमध्ये अशोक चव्हाण विजयी झाले. त्याचप्रमाणे शेजारील हिंगोली मतदारसंघात राजीव सातव यांच्या विजयात अशोकरावांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली होती. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत नांदेड जिल्ह्य़ात तीन उमेदवार विजयी झाले.

वर्षभरात यश

गेल्या वर्षभरात नांदेड जिल्ह्य़ात झालेल्या सर्व निवडणुकांमध्ये अशोक चव्हाण यांनी एकहाती यश मिळविले. विधान परिषदेच्या नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात अमर राजूरकर यांना विजय मिळविला. काँग्रेसच्या विरोधात सर्व पक्ष एकत्र आले होते. त्यानंतर झालेल्या ११ नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आठ नगरपालिकांमध्ये काँग्रेसला सत्ता मिळाली. जिल्हा परिषदेतही काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या. महानगरपालिका निवडणुकीत ८१ पैकी ७० जागाजिंकून अशोकरावांनी निर्विवाद यश मिळविले.

अशोक चव्हाण यांच्यासमोर भाजपने मोठे आव्हान उभे केले होते. भाजपने साम-दाम साऱ्यांचा वापर केला. पण अशोक चव्हाण भाजपला पुरून उरले. २० ते २५ जागाजिंकण्याचे भाजपचे उद्दिष्ट होते. पण दुहेरी आकडाही गाठता आला नाही.

चिखलीकर यांचे महत्त्व कमी ?

शिवसेनेचे आमदार प्रताप चिखलीकर-पाटील यांच्याकडे भाजपने सारी सूत्रे सोपविली होती. अशोक चव्हाण यांचे राजकीय विरोधक असलेल्या चिखलीकर यांनी स्वपक्ष शिवसेनेला दूर करून भाजपला जवळ केले. २००९च्या विधानसभा निवडणुकीत चिखलीकर यांचा मतदारसंघ आघाडीच्या चर्चेत राष्ट्रवादीला सोडण्यात आला होता. अशोकरावांनी हा मतदारसंघ मुद्दामहून सोडल्याची चिखलीकर यांची भावना झाली होती. तेव्हापासून चिखलीकर हे अशोकरावांना अडचणीत आणण्याची संधी सोडत नाहीत. महानगरपालिका निवडणुकीत भाजपचा पार धुव्वा उडाल्याने भाजपकडून महत्त्व दिले जाण्याची शक्यता नाही. यामुळेच पुढील निवडणुकीत भाजपची सहजासहजी उमेदवारी मिळणे सोपे जाणार नाही.

First Published on October 13, 2017 2:04 am

Web Title: nanded municipal corporation election 2017 ashok chavan emerges congress champion part 3
 1. H
  Hemant
  Oct 13, 2017 at 10:47 am
  याचं काॅंग्रेस नेत्यांची आणि पिवळ्या पत्रकारांची २०३० मध्ये सुंता होईल तेंव्हाचं यांचे डोळे उघडतील.
  Reply
  1. Diwakar Godbole
   Oct 13, 2017 at 10:22 am
   श्री अशोक चव्हाण ह्यांनी गड राखला हा त्यांचा पराक्रम जेमतेम पंचक्रोशीपुरताच का मर्यादित राहिला?महाराष्ट्रात नगर पालिका, जिल्हा परिषद ह्यांच्या निवडणूक पार पडल्या त्याला किती अवधी झाला?प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष ते त्या काळातही होतेच की ! त्या वेळी करिष्मा कोठे गेला होता? भाजपला मोठा पराभव चाखावा लागला म्हणून डिंडिम पिटले जात आहेत मात्र त्याच वेळी शिवसेना,एम.आय.एम ह्या पक्षांची देखील धूळदाण उडाली हे वास्तव का सांगितले जात नाही,मुंबईत आधीच तोळामासा बहुमत असलेल्या शिवसेनेला अजून धक्का बसला आहे आणि इतर पोटनिवडणुकांत भाजप/मित्र पक्ष निवडून आले,इथेच नाही तर गुजरातमध्ये देखील.जे जे काँग्रेसच्या विजयाचा शंखध्वनी जोरजोरात वाजवत आहेत त्यांची मन स्थिती अशी वाटते की मी विधवा झाले खरी मात्र माझी सवत रंडकी झाल्याचा आनंद जास्त मोठा.
   Reply
   1. R
    Ramdas Bhamare
    Oct 13, 2017 at 9:14 am
    चिखल -- शेण-- गोवऱ्या ---स्मशान !
    Reply
    1. K
     k bansidhar
     Oct 13, 2017 at 7:47 am
     पिवळी,भ्रष्ट पत्रकारिता परत दिसली आहे.अशोक चव्हाण आता निवडणूक आयोग,यंत्रे बद्दल तक्रार नाही. धान्य. भाजप जिंकली कि सगळे भ्रष्ट,आणि यंत्रे चलाख.आता काय.यावर कोणाचे धाडस झाले नाही.कारण सर्वांचे खिसे,घसे गरम केले गेले आहेत.हे जगजाहीर आहे कि ज्या गावांची नवे अशोक चव्हाण यांनी घेतली ती भिवंडी,परभणी,नांदेड येथे मुस्लिमाची संख्या जास्त आहे आणि हेकॉन्ग्रेस्स्चे विजय मुसलमानांच्या तुष्टीकरणामुळे झाले आहेत हे सांगण्याची हिम्मत नाही.मुंबईतून देशद्रोही मुस्लीम हकालपट्टी झाल्यावर या तीन गावात जावून राहिले जेथे भ्रष्ट गुंड कॉंग्रेसने त्यांना जोपासले आणि देशद्रोही कारवाया केवळ निवडणुका जिंकण्यासाठी करण्यास दिल्या.ह्या कॉन्ग्रेसच्या विजयाने देशप्रेमी हिंदुना धोक्याची गंभीर सूचना दिली आहे व त्यांनी वेळ न घालवता एकत्र येण्याची कधी नव्हे ते गरजेचे आहे.कॉंग्रेसची हिंदुत फूट पाडण्याचे षड्यंत्र सुरु आहे.२०३० या देशात सर्वत्र मुसलमानांचे राज्य येण्याचे हे संकेत आहेत.पंत प्रधान पदापासून सर्व जागी मुसामान आणण्याचे प्रयत्न आहेत कॉंग्रेसचे.यात सोनिया गांधी व परिवार आघाडीवर आहे तेव्हा धोक्याची घन्टा आहे.
     Reply