22 January 2018

News Flash

थैलीशाहीचे राजकारण नेहमी यशस्वी होत नाही; शिवसेनेचा भाजपला टोला

भारत काँग्रेसमुक्त करण्याचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवणाऱ्या भाजपसाठी नांदेडचा निकाल धक्कादायक

मुंबई | Updated: October 13, 2017 10:22 AM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (संग्रहित छायाचित्र)

नांदेड महापालिका निवडणुकीतील पराभवावरुन शिवसेनेने भाजपचा समाचार घेतला आहे. अशोक चव्हाणांनी भाजपच्या विजयाचा चौखूर उधळलेला वारु रोखला असून फोडाफोडीचे आणि थैलीशाहीचे राजकारण नेहमीच यशस्वी होत नसते, हा या निवडणुकीचा सर्वात मोठा धडा असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.

नांदेड महापालिका निवडणुकीत काँग्रेसने ८१ पैकी ७३ जागा जिंकून अभूतपूर्व यशाची नोंद केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कामगारमंत्री संभाजी निलंगेकर आणि भाजपचे अन्य नेते नांदेडमध्ये प्रचारात उतरले होते. ‘५१ पेक्षा अधिक’चे लक्ष्य जाहीर करणाऱ्या भाजपला निवडणुकीत फक्त ६ जागांवर समाधान मानावे लागले. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजपवर तोंडसूख घेण्यात आले आहे. नांदेड महापालिका निवडणुकीतील विजयाने काँग्रेसमध्ये प्राण फुंकण्याचे काम केले असे शिवसेनेने म्हटले आहे. भारत काँग्रेसमुक्त करण्याचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवणाऱ्या भाजपसाठी नांदेडचा निकाल धक्कादायक असून भाजपचा पराभव होऊ शकतो असा संदेश या निवडणुकीने दिला. या पराभवाने भाजपच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला असून सत्ता, पैशांचा वापर करणाऱ्या आणि आयाराम- गयारामांना मिठी मारणाऱ्यांना जनतेने का नाकारले याचे आत्मपरिक्षण करावे, असा सल्ला शिवसेनेने दिला.

विधानसभा निवडणुकीप्रमाणे नांदेड महापालिका निवडणुकीतही भाजपने आयारामांचे दुकानच उघडले. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या १५ नगरसेवकांनी भाजपत प्रवेश केला, पण पक्षांशी बेईमानी करुन गेलेल्या बहुतांशी नव्या ‘कमळ’धाऱ्यांना जनतेने नाकारले. फोडाफोडीचे आणि थैलीशाहीचे राजकारण नेहमीच यशस्वी होत नाही, हा या निवडणुकीता धडा असल्याचे सेनेने म्हटले आहे.

दलित आणि मुस्लीम मतांना मिळवण्यात अशोक चव्हाण यशस्वी ठरले. नांदेडात लोणचे घालायलाही काँग्रेस उरणार नाही, हा फाजील आत्मविश्वास मुख्यमंत्र्यांना महागात पडला असेही अग्रलेखात म्हटले आहे.

First Published on October 13, 2017 10:22 am

Web Title: nanded municipal elections 2017 shiv sena hits out at bjp cm devendra fadnavis after defeat congress ashok chavan
 1. विशाल
  Oct 15, 2017 at 9:38 am
  जनतेला ीक समजणाय्रांना जनतेने मूर्ख ठरवले
  Reply
  1. सुधीर
   Oct 13, 2017 at 8:11 pm
   भाजपाचा पारतिचा प्रवास चालू झाला आहे
   Reply
   1. D
    Dada Sahdev
    Oct 13, 2017 at 3:55 pm
    स्वतःची कुकर्म झाकण्यासाठी म्हणूनच आज किरीट सोमय्या नावाचं पिल्लू नगरसेवक विकत घेण्याचा "प्रयत्न झाला" चे सोंग आणताय!
    Reply
    1. Rajendra Joshi Thalnerkar
     Oct 13, 2017 at 3:42 pm
     अहमद पटेलांच्या वेळी केलेली चूक भाजपने परत केली फडणवीसांनी स्वतः सभा घेऊन चव्हाणांचे महत्व वाढविले
     Reply
     1. Rajendra Joshi Thalnerkar
      Oct 13, 2017 at 3:37 pm
      नवरा मेला तरी चालेल पण सवत रंडकी झाली पाहिजे असे शिवसेनेचे धोरण दिसते
      Reply
      1. N
       Neelima
       Oct 13, 2017 at 3:06 pm
       Hi tar tumchi haar aahe karan bjp Nanded madhe kadhich jast navte tumhala kiti jaagewer vijay milala, tumche magchya election la jaast umedwar niwadun aale hote aani aata tumcha duwa udwila aahe, bjp aata kuthe suruwat karel he pan tumche tar as waach naahi raaahile te bagha aadhi
       Reply
       1. J
        janmejay
        Oct 13, 2017 at 2:42 pm
        घाराणेशाहीचे राजकारण यशस्वी होत आहे हे भारताचे दुर्भाग्य!
        Reply
        1. गणेश देशमुख
         Oct 13, 2017 at 1:14 pm
         भाजपाचे लोणचे झाले.येण्यार्रा गुजराथ व हिमाचल प्रदेश निवडणुकित पुन्हा हाच ट्रेलर पाहयाला मिळेल.भाजप परतीच्या मार्गावर
         Reply
         1. U
          Ulhas
          Oct 13, 2017 at 12:47 pm
          खरूज होउदे "त्याला" भवानी आई रोडगा वाहीन तुला ह्याची ( ा वाटते भारूड) आठवण झाली.
          Reply
          1. N
           ncvn
           Oct 13, 2017 at 12:02 pm
           आपलं ठेवावयाचे झाकून..........आणि दुस-याचे पहावयाचे वाकून...........अशी नीती आहे....आधी मुंबई महानगरपालिएची सत्ता शिवसेनेने एकहाती आणून दःखवावी...........गेली २५ वर्षे दुस-या पक्षाच्या कुबडयावर सत्तेत आहेत.....
           Reply
           1. V
            VIVEKP
            Oct 13, 2017 at 11:44 am
            नांदेडमध्ये भाजपाला २ सीट होत्या त्या 6 झाल्या आणि शिवसेनेला १२ होत्या ती १ झाली, यावरून कळते शिवसेना कुठे चालली आहे. नांदेड हि महाराष्ट्रतील १ सिटी आहे आणि फक्त तिथे पहिल्यापासून काँग्रेस आहे त्यामुळे आत्ता वेगळे काही झाले नाहीये उलट भाजपाची मते वाढली . कालच पुणे, कोल्हापूर आणि भांडुप मध्ये भाजपचे उमेदवार निवडून आलेत. त्यामुळे भाजपचे घौडदौड थांबली असे म्हणणे मोठा विनोद आहे. नांदेड म्हणजे पूर्ण राज्य किव्वा भारत नव्हे. त्यामुळे काँग्रेसने हुरळून जाऊ नये.
            Reply
            1. Shriram Bapat
             Oct 13, 2017 at 11:20 am
             नोटबंदीने आमच्या थैल्या कुजल्या नाहीतर दाखवला असता इंगा. एवढे म्हणायचे उद्धवने बाकी ठेवले आहे.आपले ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे बघायचे वाकून ही वृत्ती सेनेला आणखी रसातळास नेणार आहे. काल कोल्हापूर, पुणे, भांडुप आणि नांदेड असे चार ठिकाणी निकाल लागले. तीन ठिकाणी भाजप विजयी झाले तर एक ठिकाणी काँग्रेस. शिवसेनेची सर्वत्र वाताहत. आपल्या वर्तनाने आपण ३ वर्षात लोकांच्या मनातून किती उतरलो आहोत याचा अंदाज शिवसेनेला येत नसेल तर सुधारणा होणे सुद्धा कठीण. बेरजेचे राजकारण हे प्रत्येक वेळी झाले नाही तरी बहुतांश वेळी यशस्वी होते. शिवसेनेच्या अमीबाचे तुकडे तुकडेच होत आहेत. आज राणे आणि शिवसेना दोघांनी एकदम "भाजपने आत्मपरीक्षण करावे " हा सल्ला देणे काव्यात्मक न्याय वाटतो. समदुःखी एका नावेत येतील का ? सोबत मनसेला घ्यावे आणि शिवसेनेचे पूर्वीचे वैभव (?) प्राप्त करून घ्यावे. भुजबळ तुरुंगातून नक्की आशीर्वाद देतील.
             Reply
             1. V
              Vijay S
              Oct 13, 2017 at 11:19 am
              शिवसेनेने आता पूर्वीप्रमाणे वसंतसेनेऐवजी अशोकसेना व्हावे आणि भाजपचा पराभव करून दाखवावा. आधी भाजपची साथ सोडून मंत्रिमंडळातून बाहेर पडून आपला स्वाभिमान जपावा. अन्यथा दररोज भाजपला शिव्यांचा रतीब घालू नये. जनता आता भरपूर पकली आहे.
              Reply
              1. P
               Pranav
               Oct 13, 2017 at 10:57 am
               स्वतःच्या अपयशाचेही विश्लेषण करा. तुम्हीही १४ जागांवरून १ जागाईवर घसरले आहात. हे म्हणजे दुसऱ्याला कमी मार्क मिळाले म्हणून नापास झालेल्याने आनंद मानण्यासारखे आहे.
               Reply
               1. N
                ncvn
                Oct 13, 2017 at 10:47 am
                शिवसेनेने आधी आपल्या ीखाली किती काळोख आहे तो बघावा.......शिवसेनेने उत्तर प्रदेश, गोवा विधान सभा निवडणुकीत बी.जे.पी. टक्कर देण्यासाठी उमेदवार उभे केले होते.....किती निवडणून आले....महाराष्टातील नांदेड महानगरपालिकेत निवडूणुकीत शिवसेनेचा फक्त १ उमेदवार निवडून आला....228 पॆकी मुंबई फक्त ८८ जगावर शिवसेनेचे नगरसेवक निवडून आलेले आहेत.......पूर्ण बहुमत नाही..... शिवसेना गेली २५ वर्षे मुंबई महानगरपालकेत स्व च्या हिमतीवर एक हाती सत्ता आणू शकत नाही.....बी.जे.पी. अपक्ष, अखिल भारतीय सेना व याच्या कुबडव्या वर मुंबई महानगरपालिएकट सत्तेवर आहेत.............विसरू नका.........
                Reply
                1. U
                 Uttam
                 Oct 13, 2017 at 10:39 am
                 आपली अवस्था मुंबई महापालिकेत काय झाली ते पाहावे. महापौर पद आणि सत्ता दोन्ही जाण्याच्या मार्गावर आहेत. BJP ८५ झाली आहे. पनवेल मध्ये एकही जागा मिळाली नाही.आत्मपरीक्षण कोणी करायला पाहिजे जरा विचार करा. अजूनही वेळ गेली नाही. जय महाराष्ट्र.
                 Reply
                 1. Load More Comments