14 August 2020

News Flash

धक्कादायक ! लग्न समारंभात वधूची बहिणच निघाली करोना पॉझिटिव्ह, त्यानंतर …

अन् वऱ्हाडी मंडळी आणि नातेवाईकांचा जीव पडला भांड्यात

नाशिक येथे रॅपिड अँटिजेंन टेस्टद्वारे सुरु असलेल्या तपासणी शिबिरात नवरीची बहिणच करोनाबाधित आढळून आल्याने गुरूवारी होणाऱ्या लग्नसमारंभातील असंख्य वऱ्हाडी मंडळी करोनाचा प्रादुर्भाव होण्यापासून बचावली. सिडकोत ही तपासणी झाली. महिलेचे विलगीकरण करून उपचार सुरू झाल्यामुळे नातेवाईकांचा जीव भांड्यात पडला.

सध्या नाशिक येथील सिडकोतील प्रभागांमध्ये नगरसेवकांनी आरोग्य तपासणी मोहीम हाती घेतली आहे. यामुळे करोनाच्या धास्ती बाळगणारे नागरीक हळूहळू घराबाहेर पडून तपासणी करू लागल्याचे सकारात्मक चित्र बघायला मिळत आहे. त्यातील काहीजण निगेटिव्ह येत असल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढत असून जे कोणी पॉझिटिव्ह आढळून येत आहे, त्यांना आपल्यापासून इतर कोणी बाधीत होण्यापासून वाचल्याचे समाधान लाभत आहे. असाच काहीसा धक्कादायक परंतु दिलासादायक प्रसंग एका ठिकाणी करोना चाचणी शिबिरात निदर्शनास आला. यामुळे गुरूवारी होणाऱ्या लग्नसमारंभातील वर्‍हाडी मंडळी करोनाच्या प्रादुर्भाव होण्यापासून दूर राहिली.

भाजपाचे नगरसेवक मुकेश शहाणे यांनी खासगी डॉक्टरांच्या मदतीने रॅपिड अँटिजेंन टेस्ट आपल्या प्रभागात सुरू केली आहे. त्यास मोठ्या प्रमाणात रुग्णांचा प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये काही जण पॉझिटिव्ह देखील आढळून आले आहे.

मंगळवारी एका महिलेची चाचणी करण्यात आली. त्यामध्ये ती पॉझिटिव्ह आली. नेमके याच महिलेच्या बहिणीचे गुरुवारी लग्न होते. त्यामुळे या महिलेचे घरी विलगीकरण करण्यात आले. तिच्यावर डॉक्टरांच्या माध्यमातून ऑनलाईन उपचार सुरू आहे. वेळीच चाचणी झाल्याने लग्नात अन्य मंडळी बाधित होण्यापासून बचावल्याची प्रतिक्रिया शिबिराचे आयोजक नगरसेवक मुकेश शहाणे यांनी व्यक्त केली. आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 24, 2020 11:12 am

Web Title: nashik brides sister corona tested positive nck 90
Next Stories
1 महाराष्ट्र निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने भाजपाशी संबंधित कंपनीला केलं होतं नियुक्त, खळबळजनक आरोप
2 ३१ जुलैनंतर लॉकडाउनचं काय? उद्धव ठाकरे म्हणतात…
3 चंद्रपूर: पत्नीचा गळा आवळून केला खून; पतीचाही आत्महत्येचा प्रयत्न
Just Now!
X