News Flash

शरद पवारांकडे सरकारचा रिमोट कंट्रोल नाही – उद्धव ठाकरे

मी माझ्या पक्षाचा प्रमुख आहे. आणि हो, तुमच्या प्रश्नाचा रोख मला कळला…

संग्रहित छायाचित्र

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे महाविकास आघाडीच्या सरकारचा रिमोट कंट्रोल नाही, ते सरकारचे मार्गदर्शक आहेत हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ दैनिकाला दिलेल्या मुलाखतीच्या तिसऱ्या भागामध्ये स्पष्ट केले आहे.

या सरकारचा ‘रिमोट कंट्रोल’ दुसऱ्या कोणाकडे आहे का? या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले की, “रिमोट कंट्रोल वगैरे असा काही प्रश्न नाहीये. आम्ही तीन वेगळे पक्ष आहोत. मी माझ्या पक्षाचा प्रमुख आहे. आणि हो, तुमच्या प्रश्नाचा रोख मला कळला… तुम्हाला शरद पवारांविषयी विचारायचं आहे का? तर शरद पवारसुद्धा रिमोट कंट्रोल म्हणून वागत नाहीत… त्यांच्या काही सूचना असतील तर त्या जरूर करतात” असे उद्धव ठाकरे म्हणाले.

“त्यांचा अनुभव दांडगा आहे. त्यांच्या अनुभवाने ते मला नक्कीच मार्गदर्शन करतात. समजा काही विषय असला तर मीही त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतो” असे मुख्यमंत्री म्हणाले. महाविकास आघाडीचे भवितव्य चांगले आहे. पंतप्रधान मोदी व सोनिया गांधी यांना लवकरच दिल्लीत जाऊन भेटू असेही त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2020 7:52 am

Web Title: ncp chief sharad pawar is guide of this govt uddhav thackeray dmp 82
Next Stories
1 आदिवासींच्या पुढय़ातील थाळी हिसकावून नका 
2 अंगणवाडी कर्मचाऱ्यांना थकीत मानधन मिळणार
3 अकरा वर्षांच्या मुलीची गळफास घेऊन आत्महत्या
Just Now!
X