News Flash

जळगावमध्ये शिवसेनेने धक्का दिल्यानंतर खडसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

नगरसेवक प्रवेशावरुन जळगावमध्ये शिवसेना-खडसे आमने सामने

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरमधील भाजपाच्या सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. वर्षा या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारी निवासस्थानी हा पक्षप्रवेश पार पडला. भाजपातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या ज्य़ेष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यासाठी हा धक्का मानला जात आहे. याचं कारण म्हणजे मुक्ताईनगर हा एकनाथ खडसेंचा बालेकिल्ला आहे. एकनाथ खडसे यांनी नगरसेवकांच्या शिवसेना प्रवेशावर भाष्य केलं असून आणखी चार नगसेवक प्रवेश करणार असल्याचा शिवसेनेचा दावा फेटाळला आहे.

भाजपाचे आणखी चार नगरसेवक शिवसेनेत येणार आहेत, असं पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितलं आहे. एकनाथ खडसे यांनी मात्र दावा फेटाळला आहे. तसंच सहा नाही तर पाच नगरसेवकांनी प्रवेश केल्याचं ते म्हणाले आहेत. “जे नगरसेवक गेलेले दिसत आहेत त्यापैकी फक्त चार नगसेवक चित्रात दिसत आहेत. अपक्षासहित एकूण पाच नगरसेवक गेल्याचं दिसत असून त्यातील तीन नगरसेवकांविरोधात अतीक्रमण केलं, बनावट दाखला जोडला या कारणासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणी सुरु आहे. एक नगरसेविका चार मुलं असल्याने आधीच अपात्र ठरली आहे,” असे एकनाथ खडसेंनी सांगितलं आहे.

आणखी वाचा- जशास तसं! मुक्ताईनगरचा वचपा काढला माथेरानमध्ये; शिवसेनेच्या १० नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

अपात्रतेच्या भीतीपीटी हे नगरसेवक गेले आहेत असा दावा एकनाथ खडसेंनी केला असून नऊ नगरसेवक माझ्यासोबत आहेत असा दावाही केला आहे.

आणखी वाचा- मुक्ताईनगरमधील भाजपचे नगरसेवक शिवसेनेत

गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया –
“मुक्ताईनगरमधील भाजपाचे नगरसेवक एकनाथ खडसे यांच्यामुळे राष्ट्रवादीत जातील असंच सर्वांना वाटत होतं. पण त्यांनी शिवसेनेत येण्याचा निर्णय घेतला. आम्हाला त्याचा आनंद आहे. यानिमित्ताने भाजपचे नगरसेवक महाविकास आघाडीत आले याचा एकनाथ खडसे यांनाही आनंदच होईल,” अशी आशा गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 27, 2021 10:58 am

Web Title: ncp eknath khadse on bjp corporators joining shivsena sgy 87
Next Stories
1 अरेरे काळाने साधला डाव! ऊसतोड कामगाराच्या डॉक्टर मुलाची झुंज ठरली अपयशी
2 प्रविण दरेकरांनी ट्विट डिलीट केलं का?; स्क्रीनशॉट शेअर करत काँग्रेस नेत्याचा सवाल
3 “उद्धव बेटा मी तुझी शिक्षिका बोलतीये; कृपया मदत कर,” ९० वर्षीय सुमन रणदिवेंची आर्त हाक
Just Now!
X