काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची दिल्लीत भेट झाल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्षात विलीन होणार का? असा प्रश्न विचारला जातोय. मात्र राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे. त्याचप्रमाणे याबाबत उदयनराजे यांना याबाबत विचारलं असता त्यांनी आक्रमक पवित्रा घेत आमच्याशी चर्चा केल्याशिवाय विलीनीकरणाचा निर्णय कसा करता येईल? असा प्रतिप्रश्न उदयनराजे यांनी विचारला आहे. आमच्यासोबत (राष्ट्रवादीचे नेते, आमदार आणि खासदार) चर्चा केल्याशिवाय पक्षाचे विलीनीकरण कसे करता येईल हा प्रश्न उदयनराजेंनी विचारला.

अहमदनगरमधल्या चौंडी या ठिकाणी उदयनराजे अहिल्याबाई होळकर यांच्य जयंतीनिमित्त (शुक्रवार ३१) त्यांना अभिवादन करण्यासाठी आले होते. येथे आयोजित जयंतीच्या कार्यक्रमानंतर उदयनराजेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना विलीनीकरणाबाबत विचारलं असता त्यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली. आम्हा सगळ्यांशी चर्चा केल्याशिवाय असा कोणताही निर्णय कसा घेतला जाईल? असा प्रश्न उदयनराजेंनी विचारला आहे. परस्पर निर्णय घेता येणार नाही. विलीनकरण का करायचं आहे हे आम्हाला सांगितलं गेलं पाहिजे. विलीनकरण करण्याचे ठरवले तर कोणत्या पक्षात करायचे हेदेखील पक्षातील सगळ्या नेत्यांना विश्वासात घेऊन ठरवले गेले पाहिजे असेही उदयनराजेंनी म्हटले आहे.

शरद पवार आणि राहुल गांधी यांची भेट झाल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्षा काँग्रेसमध्ये विलीन होईल आणि शरद पवार काँग्रेसचे अध्यक्ष होतील अशा चर्चांना काही प्रसारमाध्यमांमध्ये रंगल्या आहेत. मात्र राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी अशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचं म्हटलं आहे. तसंच उदयनराजे यांना याबाबत विचारलं असता, सगळ्यांसोबत चर्चा करून निर्णय घ्यावा लागेल, परस्पर कुणालाही निर्णय घेता येणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे.