सुधारित किमान वेतन संदर्भात सोमवारी उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत न्यायालयाने दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेत ७  सप्टेंबर ही तारीख दिली आहे. तारीख पे तारीख यामुळे वस्त्रोद्योगासह सर्वच छोटय़ा-मोठय़ा उद्योग, व्यापारात निराशा पसरली आहे. तर सायिझग-वाìपग कामगारांचा हा संप थांबणार की असाच पुढे राहणार याकडेही लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, या संदर्भात आज (मंगळवार) मुंबईत बठक होत आहे.
राज्य शासनाने यंत्रमाग कामगारांसाठी जाहीर केलेल्या सुधारित किमान वेतनाची अंमलबजावणी व्हावी यासाठी गत ४१ दिवसांपासून सायिझग-वाìपग कामगारांचा संप सुरू आहे. या संपामुळे शहराची आíथक घडी विस्कटली असून सर्वच क्षेत्रातील कामगारांवर बेकारीची वेळ आली आहे.
या प्रश्नी न्यायालयात याचिका दाखल असून त्यावर आज सोमवारी सुनावणी होती. न्यायालयाने शासनाचे म्हणणे दाखल करून घेतानाच दोन्ही बाजू ऐकून घेतल्या. त्यानंतर या सर्वाचा सविस्तर अभ्यास करण्यासाठी आणि सरकारच्या वतीने अन्य उद्योगांबाबत म्हणणे मांडण्यासाठी वेळ मिळावा यासाठी ७ सप्टेंबर ही पुढील तारीख दिली आहे, अशी माहिती इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कोष्टी यांनी दिली.