मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत पक्षासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. ३१ डिसेंबर पर्यंत पक्षाला नविन प्रदेशाध्यक्ष मिळणार असल्याच्या निर्णयाने खळबळ उडाली आहे. त्यामुळे भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांच्या निवडीला तीन महिनेही पूर्ण न होताच त्यांची उचलबांगडी करण्यात येणार आहे.

भाजपच्या आज झालेल्या बैठकी नंतर स्वत: सुधीर मुनगंटीवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. चंद्रकांत पाटील यांची प्रदेशाध्यपदी नियुक्ती होऊन तीन महिने ही पूर्ण झाले नसतानाही नविन प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती का करण्यात येत आहे असा सवाल पत्रकारांनी केला असता, राष्ट्रीय पातळीवरची प्रक्रिया आहे. प्रदेशाध्यक्षांचा कार्यकाळ संपल्याने नव्या अध्यक्षाची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्याबद्दल कोणीही चिंता करू नये, असं मुनगंटीवार यांनी सांगितलं.