19 January 2021

News Flash

महाराष्ट्रात दिवसभरात ७ हजारांपेक्षा जास्त रुग्णांना डिस्चार्ज, रिकव्हरी रेट ९३ टक्क्यांवर

आत्तापर्यंत एकूण १७ लाखांपेक्षा जास्त रुग्ण करोनामुक्त

संग्रहीत

महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये ७ हजार ३४५ करोना रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आत्तापर्यंत एकूण १७ लाख ३० हजार ७१५ करोना रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ९३.२८ टक्के इतका झाला आहे. आज राज्यात ३ हजार ७५ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. राज्यात आज ४० करोना रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्यू दर २.५७ टक्के इतका आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी १३ लाख १८ हजार ७२१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८ लाख ५५ हजार ३४१ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ५५ हजार १८० व्यक्ती होम क्वारंटाइन झाले आहेत. तर ५ हजार ५६५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात आज घडीला ७५ हजार ७६७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आज राज्यात ३७०५ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे करोना बाधितांची एकूण संख्या १८ लाख ५५ हजार ३४१ इतकी झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 7, 2020 7:49 pm

Web Title: newly 3075 patients have been tested as positive in maharashtra newly 7345 patients have been cured today scj 81
टॅग Coronavirus
Next Stories
1 “आम्ही येणार म्हणणारे फडणवीस सत्तेकडे आशाळभूतपणे पाहात आहेत”
2 दल बदलू कार्यक्रम सुरूच; जुन्या भूमिकेची आठवण करून देत शेलारांनी शिवसेनेवर डागला ‘बाण’
3 राज्यात ‘वॉटर स्पोर्ट्स’ पुन्हा सुरू करण्याबाबत दिलासादायक निर्णय
Just Now!
X