शिवबंध सोडून राष्ट्रवादीचे घड्याळ बांधणारे अभिनेते अमोल कोल्हे यांना आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिरूर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आज शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाच जणांची दुसरी यादी जाहीर केली. यामध्ये मावळमधून पार्थ पवार, नाशिकमधून समिर भुजबळ आणि शिरूरमधून अमोल कोल्हे यांना उमेदवारी जाहीर केली.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अमोल कोल्हे यांनी शिवसेनेला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे. अमोल कोल्हे यांची लढत शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याशी होणार आहे. शिवाजीराव आढळराव पाटील यांची या मतदारसंघावर चांगली पकड असून त्यांचा जनसंपर्कही चांगला आहे. त्यामुळे अमोल कोल्हे यांना शिरूरमधून उमेदवारी देत राष्ट्रवादी काँग्रेसने मोठी खेळी केली आहे. कारण अमोल कोल्हे यांचा शिवसेनेच्या कार्यकर्त्यावर मोठा प्रभाव आहे. त्यामुळे शिवसेनेची मते फुटण्याची शक्यता आहे. त्याचा फायदा राष्ट्रवादीला मिळणाच्या शक्यता आहे. अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यातील लढत रोमांचक होण्याची शक्यता असल्याची चर्चाचा स्थानिकांमध्ये आहे.

अशी आहे राष्ट्रवादीची दुसरी यादी –

मावळ – पार्थ पवार
नाशिक – समीर भुजबळ
शिरूर – अमोल कोल्हे
बीड -बजरंग सोनावणे
दिंडोरी – धनराज महाले